प्रतिनिधी, 7 ऑक्टोबर: मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. एका मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी स्थानिक भाजपमधील गटबाजीवर जोरदार टीका करत मित्रपक्षालाच लक्ष्य केले आहे.
मावळमध्ये सध्या भाजपचे तीन गट कार्यरत असल्याचा दावा आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. यातील दोन गट माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि रवींद्र भेगडे यांचे असून, तिसरा नवीन गट दलाल आणि लाभार्थ्यांचा असल्याचे शेळके यांनी म्हटले आहे.
भाजपच्या कार्यपद्धतीची खिल्ली उडवताना शेळके यांनी आरोप केला की, मुख्यमंत्र्यांसोबत फक्त फोटो काढायचे आणि काही पदरात पडले नाही की आंदोलन करायचे, अशी या गटांची स्थिती आहे. तसेच, अजित पवार आणि भाजपच्या विरोधात जी आंदोलने झाली, ती प्रत्यक्षात भाजपच्याच लोकांनी घडवून आणल्याचा दावाही त्यांनी केला. आपले राजकारण भाजपच्या या गटातटांवर अवलंबून नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार सुनील शेळके यांच्या या थेट वक्तव्यानंतर आगामी काळात मावळमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरण: युक्तिवादासाठी नीरज कौल यांची सुप्रीम कोर्टाकडे दोन दिवसांची मागणी
- सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षचिन्हावर सुनावणी; पक्षघटनेवरून शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद
- “एकदा बाहेर ते कायमचे बाहेर, मी दादांसारखी नाही”; सुनेत्रा पवारांचा जगतापांना थेट इशारा
Quick Answers
आमदार सुनील शेळके यांच्या दाव्यानुसार, मावळमध्ये सध्या भाजपचे तीन गट कार्यरत आहेत. यातील दोन गट माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि रवींद्र भेगडे यांचे असून, तिसरा गट दलाल आणि लाभार्थ्यांचा आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत फक्त फोटो काढायचे आणि काही पदरात पडले नाही की आंदोलन करायचे, अशी भाजपच्या गटांची स्थिती असल्याचा आरोप शेळके यांनी केला. तसेच, अजित पवार आणि भाजपच्या विरोधात झालेली आंदोलने प्रत्यक्षात भाजपच्याच लोकांनी घडवून आणल्याचा दावाही त्यांनी केला.
आमदार सुनील शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









