गुवाहाटी, 7 ऑक्टोबर: भारतीय महिला क्रिकेट संघात मोठा बदल झाला असून हरमनप्रीत कौर हिने तिन्ही प्रकारांतील कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. तिच्या जागी बीसीसीआयने महाराष्ट्राची ३० वर्षीय खेळाडू स्मृती मानधना हिची सर्व प्रकारांसाठी भारतीय संघाच्या नव्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.
गुवाहाटी येथे बीसीसीआय सचिव देवजित सैकिया, मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार आणि स्मृती मानधना यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीनंतर हरमनप्रीतने आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरमनप्रीत कौरला एकदिवसीय आणि कसोटी संघाचे नेतृत्व पुढेही करायचे होते, मात्र बोर्डाला तिन्ही प्रकारांत नेतृत्वबदल हवा होता. राजीनाम्यानंतरही हरमनप्रीत भविष्यात केवळ खेळाडू म्हणून खेळत राहणार असून आगामी झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी निवडलेल्या संघात तिचा समावेश आहे.
स्मृती मानधना अनेक वर्षांपासून संघाची उपकर्णधार होती आणि तिने यापूर्वीही हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व केले आहे. मानधनाच्या नेतृत्वात बंगळुरू संघाने २०२४ आणि २०२६ मध्ये महिलांच्या डब्ल्यूपीएलचे जेतेपद मिळवले असून, २०१३ पासून संघाच्या प्रगतीत तिने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. याचबरोबर, बीसीसीआयने झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी घरगुती मालिकांसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. या मालिकांसाठी शफाली वर्माकडे टी-२० संघाचे, तर दीप्ती शर्माकडे एकदिवसीय संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका १६, १८ आणि २० ऑक्टोबर रोजी रायपूर येथे खेळवली जाणार आहे. तर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका वडोदरा येथे २३, २५ आणि २८ ऑक्टोबर रोजी होईल. टी-२० संघातून प्रतिक्रा रावल हिला वगळण्यात आले असून, नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या निक्की प्रसाद, मिन्नू मणी, अनुष्का शर्मा आणि जिंतामणी कलिता यांना संघात स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे, एकदिवसीय संघात प्रतिक्रा रावल आणि हरलीन देओल यांना मधल्या फळीत संधी मिळाली आहे.
टी-२० संघ: स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा (उपकर्णधार), निक्की प्रसाद, हरमनप्रीत कौर, अनुष्का शर्मा, रिचा घोष, गुणालन कमलिनी, दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, नंदिनी शर्मा, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, जिंतामणी कलिता, मिन्नू मणी.
एकदिवसीय संघ: स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), शफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर, हरलीन देओल, तेजल हसबनीस, रिचा घोष, यास्तिका भाटिया, वैष्णवी शर्मा, नंदिनी शर्मा, श्री चरणी, क्रांती गौड, सायली सातघरे, रेणुका ठाकूर
📌 महत्वाच्या बातम्या
- एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक; सरकारला दिला ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा
- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा अचानक रद्द; देशभरात विरोधक आक्रमक
- शिवसेना कुणाची? न्यायमूर्तींच्या ‘घटनात्मक पाप’ टिप्पणीवर संजय राऊतांचे समाधान; म्हणाले…
Quick Answers
हरमनप्रीत कौर हिने तिन्ही प्रकारांतील कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर, बीसीसीआयने महाराष्ट्राची ३० वर्षीय खेळाडू स्मृती मानधना हिची सर्व प्रकारांसाठी भारतीय संघाच्या नव्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकांसाठी शफाली वर्माकडे टी-२० संघाचे, तर दीप्ती शर्माकडे एकदिवसीय संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका १६, १८ आणि २० ऑक्टोबर रोजी रायपूर येथे खेळवली जाईल. तर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २३, २५ आणि २८ ऑक्टोबर रोजी वडोदरा येथे होणार आहे.
राजीनाम्यानंतरही हरमनप्रीत भविष्यात केवळ एक खेळाडू म्हणून खेळत राहणार असून आगामी झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी निवडलेल्या संघात तिचा समावेश करण्यात आला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









