प्रतिनिधी, 7 ऑक्टोबर: पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान (MPSC Protest) एका व्हायरल व्हिडीओवरून भाजप आणि युवक काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी आंदोलनात धांगडधिंगा सुरू असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसचे पदाधिकारी शिवराज मोरे यांना लक्ष्य केले. यावर मोरे यांनी तात्काळ स्पष्टीकरण देत पलटवार केला असून अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.
नवनाथ बन यांनी एका व्हिडीओचा हवाला देत शिवराज मोरे यांच्यावर गंभीर आरोप केले. युवक आंदोलनातील हा नेता रस्त्यावर उतरून एका मुलीसोबत असलेल्या व्यक्तीशी वाद घालत असल्याचा दावा बन यांनी केला. तसेच, त्यांनी आमदार रोहित पवार यांना उद्देशून ‘हीच तुमची नाईट लाईफ आहे का?’ असा सवालही विचारला.
या आरोपांनंतर शिवराज मोरे यांनी आपली बाजू मांडली. हा व्हिडीओ आपण आंदोलनात उपोषणाला बसण्यापूर्वीचा असल्याचे त्यांनी सांगितले. एका मुलीला मदतीची गरज होती आणि एक मुलगा तिला त्रास देऊन अडवत असल्याने आपण तिकडे गेलो होतो, असे मोरे म्हणाले. भांडण सोडवण्यासाठी गेलो असता तेथील मुलांनी अंगावर धावून धक्काबुक्की केल्याचा दावा त्यांनी केला असून, त्या मुलीला तिच्या आईकडे सुखरूप सोडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बन यांच्या आरोपांना उत्तर देताना मोरे यांनी आपला कोणत्याही बारशी संबंध नसल्याचे स्पष्ट करत स्वतःचा सीडीआर तपासण्याची मागणी केली. आपण कोणत्याही बारमध्ये गेलो असल्यास किंवा नशा केली असल्याचे सिद्ध करण्यासाठी आपली नार्को आणि ब्लड टेस्ट करण्याचे आव्हानही त्यांनी दिले. नवनाथ बन यांनी आपले चारित्र्यहनन केल्याचा आरोप करत त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे.
भाजप जाणीवपूर्वक एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवराज मोरे यांनी केला. आपण या आंदोलनात आल्यापासून पोलीस आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करत असून, त्यासाठी तब्बल ८० जणांची टीम काम करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानंतरही रोहित पवारांचा माघार घेण्यास नकार, सरकारला ३ आठवड्यांत आराखडा देण्याचे निर्देश
- पुणे पदवीधरची जागा हातून जाणे हे अपयश; सुनील तटकरेंची स्पष्ट कबुली
- ‘मी नाही सांगणार…’ जया बच्चन यांनी पत्रकाराचा माईक ढकलला; कंगना रनौतने व्हिडीओ शेअर करत लगावला सणसणीत टोला
Quick Answers
नवनाथ बन यांनी एका व्हिडीओचा हवाला देत आंदोलनात धांगडधिंगा सुरू असल्याचा आरोप केला. तसेच युवक आंदोलनातील हा नेता रस्त्यावर उतरून एका मुलीसोबत असलेल्या व्यक्तीशी वाद घालत असल्याचा दावा त्यांनी केला.
हा व्हिडीओ उपोषणाला बसण्यापूर्वीचा असल्याचे सांगत, एका मुलीला मुलगा त्रास देत असल्याने आपण मदतीसाठी गेलो होतो, असे मोरे यांनी स्पष्ट केले. भांडण सोडवताना मुलांनी धक्काबुक्की केल्याचा दावा त्यांनी केला असून, त्या मुलीला तिच्या आईकडे सुखरूप सोडल्याचे त्यांनी सांगितले.
आपला कोणत्याही बारशी संबंध नसल्याचे सांगत मोरे यांनी स्वतःचा सीडीआर तपासण्याची मागणी केली. तसेच बारमध्ये गेल्याचे किंवा नशा केल्याचे सिद्ध करण्यासाठी नार्को आणि ब्लड टेस्ट करण्याचे आव्हान त्यांनी दिले.
आंदोलनात आल्यापासून पोलीस आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करत असून, त्यासाठी तब्बल ८० जणांची टीम काम करत असल्याचा दावा शिवराज मोरे यांनी केला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








