प्रतिनिधी, 7 ऑक्टोबर : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा पारा मीडियासमोर नेहमीच चढलेला असतो, हे काही नवं नाही. पण आता चक्क एका राजकीय आंदोलनादरम्यान त्यांनी एका पत्रकाराचा माईक अक्षरशः दूर ढकलल्याचा प्रकार घडलाय. नेहमीप्रमाणे या मुद्द्यावरून आता भाजप खासदार कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने जया बच्चन यांना चांगलंच फैलावर घेतलंय.
झालं असं की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी जोरदार आंदोलन पुकारलं होतं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक बडे नेते तिथे हजर होते. याच आंदोलनात जया बच्चन याही सहभागी झाल्या होत्या. पण जेव्हा एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने त्यांना त्यांच्या मागण्यांबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचीच चिडचिड पाहायला मिळाली.
Kangana Ranaut Mocks Jaya Bachchan
प्रश्नाचं उत्तर देणं तर दूरच, पण जया बच्चन यांनी चक्क पत्रकाराचा माईक हाताने मागे ढकलला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतोय. हाच व्हायरल व्हिडीओ कंगना रनौतच्या नजरेस पडला अन् तिने लगेचच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तो शेअर करत एक खोचक पोस्ट लिहिली.
कंगनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय की, “जेव्हा तुम्ही संपूर्ण जगासमोर आपला मुद्दा मांडण्यासाठी आंदोलनाला बसता… पण कुणी तुमचे प्रश्न, तुमची मागणी काय आहे हे विचारलं, तर तुमचं उत्तर असतं – ‘मी नाही सांगणार’ (नहीं बताऊंगी).” या कॅप्शनसोबत तिने हसणारी इमोजी टाकून जया बच्चन यांच्या भूमिकेची चांगलीच खिल्ली उडवली आहे.
मुळात, कंगना आणि जया बच्चन यांच्यात असा वाद झडण्याची ही पहिलीच वेळ नाही. पापाराझींवरून किंवा मीडियाला वागणूक देण्यावरून कंगनाने याआधीही अनेकदा त्यांच्यावर तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. त्यामुळेच आता या ताज्या व्हिडीओवरून पुन्हा एकदा सोशल मीडियावर नव्या वादाच्या चर्चांना उधाण आलंय. याबाबत आता समाजवादी पार्टी किंवा जया बच्चन यांच्याकडून काही प्रतिक्रिया येते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘वयाच्या ६० नंतर पुढाऱ्यांनी थांबायला हवं, कारण…’ इंदुरीकर महाराजांचं राजकारण्यांवर थेट भाष्य
- ‘अभिनयातला ‘अ’ येत नसला तरी…’; सई ताम्हणकरसाठी अभिनेत्री आरती सोलंकीची पोस्ट
- ऑक्टोबर हीटचा पचनसंस्थेवर परिणाम; उष्णतेपासून बचावासाठी ‘हे’ उपाय ठरतील फायदेशीर
Quick Answers
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत 'इंडिया' आघाडीच्या खासदारांनी आंदोलन पुकारले होते.
पत्रकाराने मागण्यांबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता, जया बच्चन यांनी प्रश्नाचे उत्तर न देता पत्रकाराचा माईक हाताने मागे ढकलला.
कंगनाने पोस्टमध्ये लिहिले की, संपूर्ण जगासमोर मुद्दा मांडण्यासाठी आंदोलनाला बसल्यावर कुणी मागण्यांबद्दल विचारले, तर 'मी नाही सांगणार' (नहीं बताऊंगी) असे उत्तर असते, अशी खोचक टीका तिने केली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









