प्रतिनिधी, 6 ऑक्टोबर : मराठी प्रेक्षकांना कायम बॉलिवूडचं प्रचंड कौतुक असतं, पण आपल्याच मातीतल्या टॅलेंटकडे मात्र आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. याच मानसिकतेवर आता प्रसिद्ध अभिनेत्री आरती सोलंकीने (Aarti Solanki) थेट शब्दांत प्रहार केला आहे. सई ताम्हणकरच्या (Sai Tamhankar) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अडकित्ता’ या ओटीटी सिनेमातील दमदार भूमिकेने आरतीला भुरळ घातली. मात्र सईचं भरभरून कौतुक करताना आरतीने बॉलिवूड अभिनेत्रींचा उदोउदो करणाऱ्या प्रेक्षकांना चांगलीच चपराक लगावली आहे.
‘फू बाई फू’च्या मंचावरून आपल्या भन्नाट कॉमेडीने सर्वांना खळखळून हसवणारी आरती नेहमीच तिच्या रोखठोक मतांसाठी ओळखली जाते. यावेळी तिने सोशल मीडियावर सई ताम्हणकरसाठी एक खास पोस्ट लिहिली. ‘अडकित्ता’ सिनेमा पाहिल्यानंतर आरतीला सईचा सुरुवातीपासूनचा संघर्ष आठवला. साध्या भूमिका, आयटम साँग, निवेदिका ते थेट हिंदी चित्रपट असा सईचा थक्क करणारा प्रवास आरतीने या पोस्टमधून डोळ्यांसमोर उभा केला.
Aarti Solanki On Sai Tamhankar
याच पोस्टमध्ये आरतीने मराठी प्रेक्षकांच्या मानसिकतेवर अचूक बोट ठेवलं. “आपण मराठी प्रेक्षक म्हणून किती छोट्या मनाचे आहोत हे यातून कळतं. ज्या बॉलिवूड अभिनेत्रींना अभिनयातला ‘अ’ सुद्धा येत नाही, त्यांना आपण सुपरस्टार म्हणून डोक्यावर घेतो. पण आपल्याच मराठी चित्रपटसृष्टीतल्या गुणी अभिनेत्रींची आपल्याला मात्र अजिबात किंमत नाही,” अशा शब्दांत तिने मराठी प्रेक्षकांना खडेबोल सुनावले.
केवळ सईच नाही, तर दुसरीकडे प्रिया बापट, छाया कदम आणि अमृता खानविलकर यांसारख्या अभिनेत्रींनीही मराठी, हिंदी सिनेमे आणि वेब सीरिजमध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. खूप वर्षांच्या कठोर संघर्षानंतर या अभिनेत्रींना आजची प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे आता तरी प्रेक्षकांनी मन मोठं करावं आणि आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रींना ‘सुपरस्टार’चा दर्जा द्यावा, असं थेट आणि स्पष्ट आवाहन आरती सोलंकीने केलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ऑक्टोबर हीटचा पचनसंस्थेवर परिणाम; उष्णतेपासून बचावासाठी ‘हे’ उपाय ठरतील फायदेशीर
- विद्याधर जोशींचा संताप! “राजकारण्यांची स्पॉन्सरशिप आली आणि गणेशोत्सवाची माती झाली”
- MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे राजकारण होत असल्याचा देवेंद्र फडणवीसांचा आरोप
Quick Answers
आरती सोलंकीने सई ताम्हणकरच्या 'अडकित्ता' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ओटीटी सिनेमातील दमदार भूमिकेचे कौतुक केले आहे.
ज्या बॉलिवूड अभिनेत्रींना अभिनयातला 'अ' सुद्धा येत नाही, त्यांना मराठी प्रेक्षक सुपरस्टार म्हणून डोक्यावर घेतात, पण आपल्याच मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्रींची मात्र किंमत करत नाहीत, अशा शब्दांत आरतीने मराठी प्रेक्षकांना खडेबोल सुनावले.
आरतीने सई ताम्हणकरव्यतिरिक्त प्रिया बापट, छाया कदम आणि अमृता खानविलकर या अभिनेत्रींचा उल्लेख केला आहे.
प्रेक्षकांनी आता तरी मन मोठं करावं आणि आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रींना 'सुपरस्टार'चा दर्जा द्यावा, असे थेट आवाहन आरती सोलंकीने केले आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









