प्रतिनिधी, 6 ऑक्टोबर: जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे फार्महाऊस, हतनूर धरण आणि वरणगाव येथील डिफेन्स फॅक्टरी या परिसरात संशयित ड्रोनच्या फेऱ्या वाढल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारावरून एकनाथ खडसे यांनी मंगळवारी (दि. ६) पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या निष्क्रियतेवर आणि सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत टीका केली. स्थानिक गुप्तचर यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणाची तात्काळ सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची ठाम मागणी केली आहे.
या ड्रोनबाबत माहिती देताना खडसे म्हणाले, “गोडसगाव, सावदा, निमखेडी मार्गे हतनूर धरण आणि थेट वरणगावच्या संवेदनशील डिफेन्स फॅक्टरीपर्यंत हा संशयित ड्रोन सलग घिरट्या घालत आहे. नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत या ड्रोनचा माग काढला आहे.” या गंभीर विषयाची मंत्री गिरीश महाजन टिंगल उडवत असून त्यांच्यामुळे जिल्ह्याची सुरक्षितता धोक्यात आल्याची टीका खडसेंनी केली. ‘माझ्या प्रसिद्धीसाठी ड्रोन लागत नाही, गिरीश महाजनांनी भान ठेवावे! ’ असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, हतनूर धरणाचे अभियंता एम. एल. पाटील यांनी या संशयित प्रकाराबाबत गेल्या महिन्यात सावदा आणि वरणगाव पोलिसांत रीतसर लेखी तक्रार दिल्याची पुष्टी केली आहे. “धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संशयित हालचाली जाणवल्यामुळे आम्ही गेल्याच महिन्यात सावदा व वरणगाव पोलिसांना लेखी तक्रार दिलेली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन रात्री तसेच दिवसाही प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे,” असे एम. एल. पाटील यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद: सुप्रीम कोर्टात मंगळवारी महत्त्वाची सुनावणी
- दिल्ली कॅपिटल्सची मोठी घोषणा; सौरव गांगुली नव्या हंगामासाठी मुख्य प्रशिक्षक
- धनंजय मुंडेंच्या पत्नीबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; बीड सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
Quick Answers
माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे फार्महाऊस, हतनूर धरण आणि वरणगाव येथील डिफेन्स फॅक्टरी परिसरात संशयित ड्रोनच्या फेऱ्या वाढल्या आहेत.
स्थानिक गुप्तचर यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आरोप करत एकनाथ खडसे यांनी या प्रकरणाची तात्काळ सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची ठाम मागणी केली आहे.
खडसे यांच्या माहितीनुसार, गोडसगाव, सावदा, निमखेडी मार्गे हतनूर धरण आणि थेट वरणगावच्या संवेदनशील डिफेन्स फॅक्टरीपर्यंत हा संशयित ड्रोन सलग घिरट्या घालत आहे.
धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संशयित हालचाली जाणवल्यामुळे गेल्या महिन्यात सावदा आणि वरणगाव पोलिसांना लेखी तक्रार दिल्याची पुष्टी एम. एल. पाटील यांनी केली आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









