Share

शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद: सुप्रीम कोर्टात मंगळवारी महत्त्वाची सुनावणी

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आता शिंदे गट न्यायालयात बाजू मांडणार आहे.

Published On: 

Symbol dispute between Thackeray-Shinde

प्रतिनिधी, 6 ऑक्टोबर: शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर अद्याप तोडगा निघालेला नसून, यावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. गेल्या चार वर्षांपासून शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील हा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात ठाकरे गटाकडून पक्ष आणि चिन्हाबाबतचा आपला युक्तिवाद पूर्ण करण्यात आला असून, आता शिंदे गटाकडून युक्तिवाद केला जात आहे.

या सुनावणीत शिंदे गटाच्या बाजूने ज्येष्ठ वकील एन. के. कौल न्यायालयात युक्तिवाद करणार आहेत. मागील सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी त्यांना अनेक प्रश्न विचारले होते. यावेळी आपली बाजू मांडताना शिंदे गटाच्या वकिलांनी काही जुन्या प्रकरणांचाही संदर्भ न्यायालयात दिला होता.

दरम्यान, मागील काही सुनावण्यांमध्ये पक्षाचे चिन्ह गोठवून दोन्ही गटांना नवीन चिन्ह देण्याविषयीचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. यावर, याबाबतचे सर्व अधिकार निवडणूक आयोगाचे असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. मंगळवारच्या सुनावणीनंतर आता धनुष्यबाण आणि मूळ पक्ष नक्की कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही