प्रतिनिधी, 6 ऑक्टोबर: आगामी आयपीएल हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघ व्यवस्थापनात मोठा बदल करत नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्याकडे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असून, फ्रँचायझीने मंगळवारी, ६ ऑक्टोबर रोजी याबाबत अधिकृत मोहोर उमटवली.
या नव्या नियुक्तीमुळे गांगुली आता हेमंग बदानी यांची जागा घेणार आहेत. यापूर्वी बदानी हेच दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचे कामकाज पाहत होते. आता त्यांच्या जागी गांगुली संघाला मार्गदर्शन करताना दिसतील.
गांगुली आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील संबंध २०१९ पासूनचे आहेत. त्या वर्षी ते पहिल्यांदा संघाचे सल्लागार म्हणून रुजू झाले होते. त्या अनुभवानंतर फ्रँचायझीने त्यांच्याकडे ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ म्हणूनही जबाबदारी सोपवली होती. आता त्यांच्या हाती थेट मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे आली आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेंच्या पत्नीबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; बीड सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
- रस्त्यावर उतरून गुन्हेगारांमध्ये कायद्याची दहशत निर्माण करा; सर्वोच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश
- विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर रोहित पवारांचा सरकारला २ दिवसांचा अल्टीमेटम; पुणे ठप्प करण्याचा इशारा








