प्रतिनिधी, 3 ऑक्टोबर: सासू-सुनेच्या नात्याबद्दल नेहमीच चर्चा असते. अशातच बांदेकर कुटुंबातील सासू-सुनेची जोडी सध्या चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहमसोबत विवाहबंधनात अडकलेली अभिनेत्री पूजा बिरारी (Pooja Birari) हिने आपली सासू म्हणजेच सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांच्याबद्दल मोकळेपणाने संवाद साधला आहे.
‘इट्स मज्जा’ला दिलेल्या एका नुकत्याच मुलाखतीत पूजाने सासरच्यांसोबतच्या नात्यावर भाष्य केले. सासूबाई स्ट्रिक्ट आहेत का, या प्रश्नावर बोलताना तिने सुरुवातीला त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती वाटत असल्याचे मान्य केले. कोणी सासू कशी आहे विचारल्यावर आपण मुद्दाम ‘त्या खूप स्ट्रिक्ट आहेत आणि मी त्यांच्यासमोर शांत असते’, असे सांगत असल्याचे ती म्हणाली. मात्र, प्रत्यक्षात त्या खूप गोड असल्याचेही पूजाने स्पष्ट केले.
Pooja Birari On Suchitra Bandekar
पहिल्या भेटीचा किस्सा सांगताना पूजा म्हणाली की, सोहमने आईला भेटायचे हे न सांगताच अचानक भेट घडवून आणली होती. अचानक सुचित्रा समोर आल्यावर सरप्राईज टेस्ट असल्यासारखे वाटले आणि पोटात गोळा आला. पण घरी गेल्यावर सुचित्रा बांदेकर यांनी एका वाक्यात तिची भीती घालवली. “या क्षणाला कसे रिअॅक्ट व्हायचे हे मलासुद्धा कळत नाहीये, आपण दोघी सेम पेजवर आहोत,” असे त्या म्हणाल्या होत्या. न सांगता भेटवल्यामुळे दोघींच्याही मनात त्यावेळी सोहमबद्दल राग होता.
कालांतराने ओळख वाढल्यानंतर सुचित्रा यांनी पूजाला, “मला मुलगी नाहीये, पण मला या सर्व गोष्टींची खूप हौस आहे, त्यामुळे मी गिफ्ट देताना नाही म्हटलंस तर याद राख,” अशी तंबी प्रेमाने दिली होती. आता त्यांच्यात खूप कम्फर्ट आणि समजूतदारपणा असून लग्नापूर्वी मनात असलेली सासूविषयीची धास्ती आता अजिबात उरली नसल्याचे पूजाने सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुंबईसह महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू; हवामान विभागाची अधिकृत घोषणा
- चंद्रशेखर बावनकुळेंनी बांधावर बसून शेतकऱ्यांसोबत केले जेवण, जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
- ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींची पोलिसांकडून चौकशी; आमदार संजय गायकवाडांची मालमत्ता जप्तीची मागणी
Quick Answers
अभिनेत्री पूजा बिरारीचा विवाह आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहमसोबत झाला आहे.
सुरुवातीला आदरयुक्त भीती वाटत असल्याने सासू खूप स्ट्रिक्ट आहेत असे आपण सांगत असलो, तरी प्रत्यक्षात त्या खूप गोड आहेत असे पूजा बिरारीने स्पष्ट केले.
घरी गेल्यावर सुचित्रा बांदेकर यांनी, "या क्षणाला कसे रिअॅक्ट व्हायचे हे मलासुद्धा कळत नाहीये, आपण दोघी सेम पेजवर आहोत," असे सांगून पूजाची भीती घालवली होती.
सुचित्रा बांदेकर यांनी पूजाला, "मला मुलगी नाहीये, पण मला या सर्व गोष्टींची खूप हौस आहे, त्यामुळे मी गिफ्ट देताना नाही म्हटलंस तर याद राख," अशी प्रेमाने तंबी दिली होती.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









