Share

महिला आशिया कपमध्ये टीम इंडियाचा दणका, पाकिस्तानला सर्वात नीचांकी धावसंख्येवर रोखलं!

महिला आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला असून पाकिस्तानचा डाव अवघ्या ५५ धावांवर आटोपला.

Published On: 

Women's Asia Cup 2026 Indian team celebrating victory over Pakistan

Asia Cup 2026: महिला आशिया कपमधील ‘हाय व्होल्टेज’ लढतीत टीम इंडियाने पाकिस्तानला अक्षरशः चारही मुंड्या चित केलं आहे. दुबईत झालेल्या या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी असं काही वादळ आणलं की, पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या ५५ धावांवर गारद झाला. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील ही पाकिस्तानची आजवरची सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली आहे. त्यामुळेच, सुरुवातीपासूनच हा सामना एकतर्फीच होणार, हे स्पष्ट झालं होतं.

पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण हा निर्णय त्यांच्याच अंगलट आला. भारतीय गोलंदाजांसमोर त्यांची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सुरुवातीला शवाल जुल्फिकार (१४ धावा) आणि मुनीबा अली (१३ धावा) यांनी २७ धावांची भागीदारी करून थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर त्यांची अक्षरशः घसरगुंडी उडाली. अवघ्या ८ धावांमध्ये पाकिस्तानने ६ विकेट्स गमावल्या आणि १८.१ षटकांत त्यांचा संपूर्ण डाव ५५ धावांवर संपुष्टात आला.

INDW vs PAKW Asia Cup 2026

महिला आशिया कप: भारताच्या फिरकीसमोर पाकिस्तान हतबल

या ऐतिहासिक कामगिरीत भारताच्या गोलंदाजांचा सिंहाचा वाटा राहिला. फिरकीला अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर श्री चरणी आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेत पाकिस्तानच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्यांना अनुभवी दीप्ती शर्मा (२ विकेट्स) आणि शफाली वर्मा (१ विकेट) यांनी मोलाची साथ दिली. पाकिस्तानच्या ९ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

विजयासाठी मिळालेलं ५६ धावांचं किरकोळ आव्हान भारताने अवघ्या ८.४ षटकांत ३ विकेट्स गमावत सहज पार केलं. सुरुवातीला स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा (१२ धावा) स्वस्तात बाद झाल्याने पाकिस्तानच्या फातिमा सनाने (३ विकेट्स) सामन्यात थोडी धाकधूक वाढवली होती. पण दुसरीकडे, कर्णधार हरमनप्रीत कौर (नाबाद १८) आणि दीप्ती शर्मा (नाबाद १२) यांनी अत्यंत संयमी खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या दणदणीत विजयासह टीम इंडियाने आशिया कपमधील आपला दबदबा आणि गटातील अव्वल स्थान आणखी भक्कम केलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही