Raj Thackeray: मनसे आणि भाजपमध्ये सध्या जोरदार जुंपली आहे. निमित्त ठरलंय भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचं एक विधान. त्यांनी थेट राज ठाकरेंच्या नातवाच्या, म्हणजेच अमित ठाकरेंच्या मुलाच्या शाळेवरून टीका केली होती. पण आता मनसेनेही याला जशास तसं उत्तर दिलंय. मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि भाजपच्या बड्या नेत्यांचीच ‘शालेय कुंडली’ वाचून दाखवली.
MNS vs BJP: गजानन काळेंचा अमित साटमांवर हल्लाबोल
बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे स्वतः इंग्रजी शाळेत शिकले होते. मग त्यांच्या मराठीनिष्ठेवर शंका घेणार का? असा सवाल खुद्द राज ठाकरेंनी आधीच विचारला होता. याचीच आठवण काळेंनी करून दिली. दुसरीकडे, हिंदुत्वाचा मुद्दाही त्यांनी छेडत लालकृष्ण अडवाणी ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले. अरुण जेटली सेंट झेव्हियर्समध्ये होते. निर्मला सीतारामन यांचं शिक्षणही मिशनरी शाळेतच झालं.
गजानन काळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबाचाही उल्लेख केला. इच्छा नसतानाही हे सांगावं लागतंय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. साटम यांना फडणवीसांनी वेळेत रोखलं नसल्यामुळेच हे बोलावं लागतंय. दिवीजा फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचं शिक्षणही ख्रिश्चन मिशनरी शाळेतच झाल्याचा दावा काळेंनी केला. स्वतः अमित साटमही त्याच वातावरणात शिकलेत. असंही ते म्हणाले.
हा संपूर्ण वाद साटम यांच्या एका आव्हानामुळे सुरू झाला होता. हिंमत असेल तर नातवाचं ॲडमिशन ‘बालमोहन’ या मराठी शाळेत करून दाखवा, असं साटम म्हणाले होते. मगच मराठीवर बोला, असा टोला त्यांनी अमित ठाकरेंना लगावला होता. आशिष शेलारांपेक्षा आपण कसे भारी आहोत, हे दाखवण्यासाठीच साटम अशी स्टंटबाजी करत असल्याचा गंभीर आरोप काळेंनी केलाय. आता हा वाद आणखी किती चिघळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शिवसेना चिन्ह आणि मोदींच्या दौऱ्यावर शरद पवारांचा मोठा खुलासा; महागाईवरूनही सरकारला घेरलं
- धक्कादायक! जरांगेंच्या आंदोलनात शोककळा; अंतरवाली सराटीत 40 वर्षीय आंदोलकाचा मृत्यू
- मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा; आज अनेक जिल्ह्यांत बंदची हाक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











