‘RSS महिलेला संघचालक करणार का?’; पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

महिला आरक्षणावरून पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपला घेरत काँग्रेसचा विरोध कुठल्या मूर्खाने सांगितला, असा सवाल केला.

Published On: 

Prithviraj Chavan attacks BJP

नाशिक : “काँग्रेस महिला आरक्षणाला विरोध करते, असा दावा कोणत्या मूर्खाने केला?” असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सत्ताधारी पक्षावर कडाडून टीका करताना केला.

२०२३ मध्ये घटनादुरुस्ती विधेयक आम्ही आणले होते आणि महिला आरक्षणाचे खरे जनक काँग्रेसच (Congress) आहे, असे चव्हाण यांनी ठामपणे सांगितले. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) महिलेला संघचालक करणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपवर टीका करत पृथ्वीराज चव्हाण यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले की, “प्रत्येक पेपर फुटतो आणि त्याला भाजपचे ज्येष्ठ नेते जबाबदार असतात, पेपर दोन-दोन कोटीला विकला जातो. कोणालाही शिक्षा होत नाही, हे प्रकरण सिरिअस घ्या कोणालातरी शिक्षा झाली पाहिजे.”

Prithviraj Chavan attacks BJP

“भाजपच्या काळात हा गोरखधंदा सुरू झाले. सगळीकडे रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. कुंभमेळ्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट नाही. शक्तिपीठ मार्गात 40-40 टक्के कमिशन घेतले जाते. कुंभमेळ्याच्या संदर्भात स्थानिकांना विश्वासात घेण्यात आलं नाही. ठराविक लोकांनाच कंत्राटे देण्यात आली आहेत.” असा आरोप चव्हाण यांनी भाजपवर केला आहे.

चव्हाण यांनी सांगितले की, दहा दिवसांपासून सुरू असलेल्या काँग्रेसच्या शिबिराच्या समारोपाच्या सत्रासाठी राहुल गांधी उपस्थित राहिले. त्यांनी राज्यातील नेत्यांशी बैठक घेतली आणि त्यादरम्यान कुंभमेळा, शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प व शेतकऱ्यांचे प्रश्न यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

शक्तीपीठ महामार्ग, कुंभमेळ्याशी संबंधित कामे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांबाबत माहिती संकलित करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कुंभमेळ्याच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे आरोप समोर येत आहेत. या भ्रष्टाचाराचा मुद्दा केंद्रीय स्तरावर उपस्थित करण्याचा आपला मानस असल्याचे राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना कळवले आहे.

काँग्रेस नेत्यांशी झालेल्या बैठकीनंतर राहुल गांधी एका शिबिरात सहभागी होणार असून, तिथे ते पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, असे वृत्त आहे. या शिबिरासाठी राज्यातील विविध भागांतून पक्ष कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही