Share

संभाजीनगर सत्र न्यायालयातील कॅन्टीन FDA च्या रडारवर? वकिलाच्या FDA कडे तक्रारीने खळबळ

छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालय परिसरातील कॅन्टीनची तातडीने अन्न सुरक्षा तपासणी करण्याची मागणी उच्च न्यायालयाचे वकील ॲड. ईश्वर नरोडे यांनी FDA कडे केली आहे.

Published On: 

Sambhajinagar district and sessions court canteen food safety complaint to FDA

छत्रपती संभाजीनगर- न्याय मंदिरात न्याय मिळतो, पण तिथलं अन्न खरोखरच सुरक्षित आहे का? हजारो लोकांच्या आरोग्याचा हा गंभीर प्रश्न आता थेट ऐरणीवर आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा व सत्र न्यायालय परिसरातील उपहारगृहे आता अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) रडारवर येण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाचे वकील ॲड. ईश्वर नरोडे यांनी FDA कडे थेट कायदेशीर तक्रार दाखल केली असून, तातडीने ‘सरप्राईज चेकिंग’ करण्याची मोठी मागणी केली आहे.

Sambhajinagar Court Canteen: कॅन्टीनच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह?

न्यायालय परिसरात दररोज न्यायाधीश, वकील, पोलीस आणि हजारो सामान्य नागरिक येत असतात. या सर्वांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये, यासाठी इथल्या सर्व कॅन्टीन, फूड स्टॉल्स आणि कॅफेटेरियांची कसून तपासणी व्हावी, असा आग्रह ॲड. नरोडे यांनी धरला आहे.

त्यांनी एफडीए अधिकाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये अन्न सुरक्षा कायदा २००६ चा संदर्भ देत अनेक गंभीर मागण्या केल्या आहेत. संबंधित विक्रेत्यांकडे वैध FSSAI परवाना आहे का? पिण्याचे पाणी, वापरलेले खाद्यतेल, मसाले आणि किचनची स्वच्छता नेमकी कशी आहे? याची तातडीने तपासणी व्हावी. एवढंच नाही, तर नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करून त्याचा कृती अहवाल (ATR) द्यावा, अशी स्पष्ट मागणी नरोडे यांनी केली आहे.

आता या लेखी तक्रारीनंतर FDA अधिकारी न्यायालयीन परिसरातील या कॅन्टीनवर खरंच कारवाईचा बडगा उगारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही