Share

Junnar Crime: ‘महाराष्ट्र उत्तर प्रदेश-बिहारच्या पुढे चालला’; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

जुन्नरमधील १० वर्षीय चिमुकलीच्या हत्येवर रोहित पवारांनी संताप व्यक्त करत महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवर सरकारला घेरले

Published On: 

Rohit Pawar on Junnar crime CM Fadnavis

Pune Crime : पुण्यातील जुन्नर येथे एका १० वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. नसरापूर सारखीच येथील घटनेची आठवण करून देणारी ही घटना जुन्नरमधील पिंपळवडी येथे घडल्याने लोकांमध्ये संताप वाढत आहे.

सत्ताधारी आमदाराच्याच गावात हा अत्याचार आणि हत्येचा प्रकार घडल्यामुळे लोकांचा रोष अधिक तीव्र आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस (CM Fadnavis) यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. गुन्हेगारीच्या दराबाबत महाराष्ट्र आता उत्तर प्रदेश आणि बिहारलाही मागे टाकत असल्याचे निरीक्षण रोहित पवार यांनी नोंदवले.

Rohit Pawar on Junnar crime CM Fadnavis

माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी चिमुकलीच्या हत्येवरून आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “स्थानिक आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यांच्याच गावात अशा घटना घडत असतील, तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती किती गंभीर झाली आहे, हेच यातून सिद्ध होते. आम्ही अधिवेशनात अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला आहे. या अत्याचारांची किंमत पीडित कुटुंबांनाच मोजावी लागली आहे. आम्ही पीडित कुटुंबे आणि वकिलांचीही भेट घेतली आहे.”

“सातत्याने काही आकडे सरकारसमोर मांडत आहोत. खरंतर शक्तीसारखे कडक कायदे महाराष्ट्रात आणावा लागेल. दुर्दैवाने असं की, देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. ते शब्दाचा खेळ करतात. आकडेवारीतून सांगतो की, महाराष्ट्र उत्तर प्रदेश, बिहारच्या पुढे चालला आहे. परंतु मुख्यमंत्री फडणवीस हे आकडेवारीचा खेळ करून यावरील लक्ष दुसरीकडे नेतात.” असे रोहित पवार म्हणाले.

“महाराष्ट्रात अत्याचार होत आहेत. मुली, महिलांवर अत्याचार होत आहेत. अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कायदा आणि पोलिसांची भीती कमी झाली आहे. पोलिसांचा वापर हा व्हिआयपी, आमदार, खासदारांना संरक्षण देण्यासाठी वापरला जात आहे. त्यामुळे सामान्य घरातील मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहे.” असा आरोप रोहित पवारांनी केला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही