मुंबई : शिवसेनेच्या (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावरील (Social Media) एका पोस्टद्वारे राऊत यांनी मोदींवर टीका करत त्यांच्याबद्दल अनेक धारदार टिप्पणी केली आहे. मात्र, या सर्व टीकेनंतरही एका महत्त्वाच्या सत्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे नमूद करत त्यांनी मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
संजय राऊत यांनी आपल्या X वरील केलेल्या पोस्टमध्ये मोदींना ‘५६ इंच का छोटा बंदर’, ‘अमेरिकेचे गुलाम’, ‘अनाडी’, ‘हुकूमशहा’, ‘पळपुटे’ तसेच ‘गौतम अदाणीचा मित्र’ आणि ‘लोकशाहीचा मारेकरी’ अशा शब्दांत लक्ष्य केले आहे. त्याचबरोबर मोदींवर टीका करा, ट्रोल करा, मात्र एक सत्य नाकारता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
Sanjay Raut criticizes PM Narendra Modi
संजय राऊत यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “तोच एकमेव माणूस आहे जो राजीनामा देऊन भारत वाचवू शकतो!” या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
राऊत हे केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींच्या धोरणांवर वारंवार टीका करत असतात. त्यांनी केलेल्या या पोस्टमध्येही मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
या पोस्टनंतर, सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधकांकडून राऊत यांच्या विधानावर विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. आता भाजप या विधानावर आगामी काळात काय प्रतिक्रिया देते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘आपण विरोधातच आहोत, जोमाने काम करा’; शरद पवारांचा कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश
- तुकाराम मुंढे फार काही वेगळे काम करत नाहीत; समीर वानखेडेंचे विधान चर्चेत
- ‘होय, मला दिमागी नक्षल असल्याचा अभिमान आहे!’ चिदंबरम यांचा थेट मोदींवर पलटवार












