Share

‘एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत’; प्रताप सरनाईकांची मोठी इच्छा

प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी शिवसैनिक म्हणून इच्छा व्यक्त केली असून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

Published On: 

Pratap Sarnaik on Eknath Shinde CM

Pratap Sarnaik : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आमदारांशी संबंधित ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) ची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री प्रताप सरनाईक, भरत गोगावले आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या विषयावर विविध विधाने केली आहेत.

ही चर्चा अधिक तीव्र झाली असतानाच, धाराशिवचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी एक शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

Pratap Sarnaik on Eknath Shinde CM

मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत संख्याबळ अत्यंत महत्त्वाचे असते. सध्या राज्यात भारतीय जनता पक्ष (BJP), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि शिवसेना (Shivsena) यांचा समावेश असलेली ‘महायुती’ सत्तेवर आहे. भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचा आहे.

धाराशिव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “भविष्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाचे अधिक खासदार आणि आमदार निवडून आले तर आम्ही मुख्यमंत्रीपदावर दावा करू.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही