Crow Intelligence: रस्त्यावरून जाताना एखादा कावळा तुमच्याकडे एकटक बघतोय? असं तुम्हाला कधी वाटलंय का? नजर न हटवता तो थेट तुमच्याकडे बघतो. हे थोडं विचित्र वाटतं. पण यामागे मोठं वैज्ञानिक कारण आहे. कावळे नुसतेच इकडे-तिकडे बघत नसतात. ते तुमच्यावर बारीक नजर ठेवतात. आणि हो, ते तुमचा चेहराही पक्का लक्षात ठेवतात!
कावळे हे पृथ्वीवरील सर्वात हुशार प्राण्यांपैकी एक आहेत. त्यांची बुद्धिमत्ता वैज्ञानिकांनाही अचंबित करते. ते हत्यारांचा (Tools) वापर करतात. कठीण कोडी सोडवतात. पण याहूनही भन्नाट गोष्ट म्हणजे, ते माणसांचे चेहरे हुबेहूब ओळखतात. तुम्ही त्यांच्याशी कसं वागलात, हे ते कधीच विसरत नाहीत.
कावळ्यांची स्मरणशक्ती: माणसांचे चेहरे लक्षात ठेवणारा हुशार पक्षी
२०१० मध्ये ‘अॅनिमल बिहेविअर’ या जर्नलमध्ये एक मोठा अभ्यास प्रसिद्ध झाला होता. वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉ. जॉन मार्झलफ आणि त्यांच्या टीमने हा शोध लावला. यातून एक धक्कादायक माहिती समोर आली. कावळे माणसांचे कपडे किंवा हालचालींवरून नाही, तर थेट चेहऱ्यावरून माणसाला अचूक ओळखतात.
ते केवळ चेहराच नाही, तर तुमचं वागणंही अचूक टिपतात. समजा, तुम्ही त्यांच्याकडे न बघता शांतपणे निघून गेलात, तर ते उडून जात नाहीत. पण जर तुम्ही त्यांच्याकडे एकटक बघत चालत गेलात, तर ते लगेच उडून जातात. कारण त्यांना तिथे धोक्याची चाहूल लागते.
संशोधकांनी यासाठी एक भन्नाट प्रयोग केला होता. त्यांनी वेगवेगळे मुखवटे (Masks) घालून कावळ्यांसमोर जाण्याचा प्रयोग केला. ज्या मुखवटे घातलेल्या माणसांनी त्यांना त्रास दिला होता, त्यांना पाहताच कावळे आक्रमक झाले. विशेष म्हणजे, कित्येक महिन्यांनंतरही कावळे तो चेहरा विसरले नाहीत. त्यामुळेच आजकाल संशोधक कावळ्यांवर अभ्यास करताना वेगवेगळे मुखवटे घालतात.
कावळे फक्त वाईट गोष्टीच नाही, तर तुमचं चांगलं वागणंही लक्षात ठेवतात. जर तुम्ही त्यांना दाणे टाकले किंवा प्रेमाने वागलात, तर ते तुम्हाला मित्र मानतात. सर्वात खतरनाक गोष्ट म्हणजे, ते ही माहिती फक्त स्वतःपुरती ठेवत नाहीत. एखाद्या माणसाने त्रास दिल्यास, ते त्यांच्या संपूर्ण टोळीला त्या माणसाच्या चेहऱ्याची माहिती देतात. त्यामुळे पुढच्या वेळी कावळ्याला कधीही कमी लेखू नका!
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘मेलोनी समजून मिठी मारली नाही ना?’, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्रालयाचा कडक इशारा
- मनोज जरांगे पाटलांना 102 ताप; टायफॉइडची लक्षणं, रुग्णालयातून मोठी अपडेट
- Rahul Gandhi vs BJP: अमित शहांवरील ‘ती’ टीका भोवणार? राहुल गांधींना लोकसभेकडून डेडलाईन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











