काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) हे काँग्रेसमध्ये येणार होते. मंत्रीपद दिले जावे, अशी अटही त्यांनी घातली होती. नागपूरमधील दोन नेत्यांच्या हालचालींमुळे आपण निवडून येणार नाही, अशी भीती मुंडे यांनी व्यक्त केली होती, असा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला आहे.
तसेच, मुंडे यांच्या पक्षप्रवेशाला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा विरोध होता, असेही त्यांनी नमूद केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी ही माहिती दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर भाजप काय प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Gopinath Munde Congress entry revelation
“भाजप नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये सामील होणार होते. मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आणि अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठका झाल्या होत्या. गोपीनाथ मुंडे यांनी मंत्री करण्याची अट घातली होती, ते म्हणाले होते. ‘मला मंत्री करा, अन्यथा, नागपूरमधील ते दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत,” असा दावा चव्हाण यांनी केला.
मनमोहन सिंग यांचा विरोध
मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत पक्षाच्या हायकमांडशी, विशेषतः सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा झाली होती. सोनिया गांधी यांनी मुंडे यांच्या प्रवेशाला मंजुरी दिली होती, तरीही ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.
कारण विरोधी पक्षातील खासदाराला पक्षात घेऊन मंत्रीपद देण्यास तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ठाम विरोध दर्शवला होता. या घडामोडींच्या दरम्यान, पंतप्रधानांकडे जाण्याऐवजी आपण थेट सोनिया गांधींकडे गेलो, याची खंत चव्हाण यांनी व्यक्त केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगे पाटलांना 102 ताप; टायफॉइडची लक्षणं, रुग्णालयातून मोठी अपडेट
- Rahul Gandhi vs BJP: अमित शहांवरील ‘ती’ टीका भोवणार? राहुल गांधींना लोकसभेकडून डेडलाईन
- ‘75 वर्षांवरील नेत्यांनी सत्ता सोडावी अन् युवांच्या हाती सत्ता द्यावी’; संजय राऊतांचा मोदींवर निशाणा
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









