Share

‘2047 पर्यंत भारत विकसित होणारच’; लाल किल्ल्यावरून PM मोदींचा मोठा संकल्प

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत विकसित भारताचा संकल्प व्यक्त केला.

Published On: 

PM Narendra Modi Independence Day speech at Red Fort

दिल्ली : संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day) उत्साह दिसून येत आहे. देशाची राजधानी दिल्लीतही स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी १३ व्यांदा देशाला संबोधित केले. आजचा हा सोहळा विशेष महत्त्वाचा आहे, कारण भारताचे राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’च्या रचनेला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, २०४७ पर्यंत भारत नक्कीच एक विकसित राष्ट्र बनेल, असा ठाम संकल्पही त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींनी यावर्षी १३ व्यांदा राष्ट्रध्वज फडकवला. लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना ते म्हणाले, “आज तिरंगा प्रत्येक घरात आणि प्रत्येक मनात आहे. देश मोठ्या उत्साहाने आणि नवीन संकल्पांसह पुढे जात आहे. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ज्या महान व्यक्तींनी देशासाठी बलिदान दिले आणि स्वातंत्र्यासाठी सर्वस्व पणाला लावले, त्यांचे आपण स्मरण करूया. मी त्या महान क्रांतिकारकांना अभिवादन करतो.”

PM Narendra Modi Independence Day speech at Red Fort

“देश आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. मागील काही दिवसांपासून देशाच्या काही भागात पूरस्थिती होती. भूस्खलन झाले. अनेक कुटुंबाना फटका बसला, ज्यामुळे अनेक कुटुंबे प्रभावित झाली आहेत. मी प्रभावित कुटुंबांना खात्री देतो की संपूर्ण देश तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जेव्हा एखादे राष्ट्र महान बनते, तेव्हा ते आपल्या स्वप्नांच्या, संकल्पांच्या आणि क्षमतेच्या बळावर प्रगती करते.”

छोटे स्वप्न नव्हे, तर मोठे स्वप्न, लक्ष्य ठेवल्यास विचार विकसित होतात. यामुळे विकासाला चालना मिळते. आपले संकल्प ठाम आणि मोठे असले पाहिजेत; यामुळे आपल्याला अधिक प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते आणि अखेरीस स्वप्ने सत्यात उतरवण्यास मदत होते. आमचेही एक स्वप्न आहे.

२०४७ सालापर्यंत देशाला स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होतील आणि तोपर्यंत देशाचा विकास साधण्याचा आमचा निर्धार आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश विकसित राष्ट्र बनण्याचे ध्येय ठेवतो, त्यावेळी त्याच्या साहसाची जोरदार चर्चा होते’, असे मोदी यांनी पुढे सांगितले.

“मी काही वाऱ्यावर दावे करत नाही. गेल्या १२ वर्षांत, समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी एका संकल्पासोबत देशाच्या विकासाला गती दिली आहे. अनेकांनी अत्यंत कमी कालावधीत गरिबीतून बाहेर पडण्यात यश मिळवले आहे.

या १२ वर्षांत भारत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. सुरुवातीच्या काळात देशाचा विकास तितका वेगवान झाला नाही. गेल्या १२ वर्षांत तो वेगाने पुढे सरकला आहे. आता १४० कोटी लोकांचा संकल्प रोखणे कठीण आहे.

या काळात संरक्षण क्षेत्रातील उत्पादनात चारपट, खादी आणि ग्रामोद्योगांमध्ये पाचपट, तर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात सातपट वाढ झाली आहे. आधुनिक रेल्वे डब्यांच्या उत्पादनात २१ पट आणि मोबाईल फोनच्या निर्मितीत ३१ पट वाढ झाली आहे.

डिजिटल युगातही लक्षणीय प्रगती झाली आहे. इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या चौपट झाली असून, पेटंट ग्रँट देखील 4 पटीने वाढले. डिजिटल व्यवहारांमध्ये १०० पट वाढ झाले, असे म्हणत मोदींनी आकडेवारीही सादर केली.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही