Share

‘ताल’साठी सुभाष घाई यांनी ऐश्वर्याला म्हटलं होतं, “तुला बरबाद करून टाकेल…”

सुभाष घाई यांनी ‘ताल’ सिनेमासाठी Aishwarya Rai ला साधेपणात साकारण्यासाठी दिलेल्या इशाऱ्याचा मोठा खुलासा केला.

Published On: 

Subhash Ghai’s warning to Aishwarya Rai during 'Taal'

Aishwarya Rai : अभिनेत्री ऐश्वर्या राय आज कोणत्याही ओळखीची मोहताज नाही. तिचे सौंदर्य आणि अभिनयकौशल्य यांच्या जोरावर तिने चाहते आणि बॉलीवूड या दोन्ही क्षेत्रांत आपले स्थान अढळ केले आहे.

आजही प्रेक्षक तिचे चित्रपट मोठ्या उत्साहाने पाहतात. मात्र, एक काळ असा होता जेव्हा या अभिनेत्रीलाही चढ-उतारांचा सामना करावा लागला होता. आता प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घाई यांनी तिच्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट उघड केली आहे.

Subhash Ghai’s warning to Aishwarya Rai during ‘Taal’

ऐश्वर्याची मुख्य भूमिका असलेला ‘ताल’ (Taal) हा चित्रपट प्रदर्शित होऊन २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाच्या संदर्भात घई यांनी एकदा ऐश्वर्याला म्हटले होते, “मी तुला बरबाद करुन ठेवेल…” (I will ruin you); तेव्हा नक्की काय घडले होते, ते जाणून घेऊया…

सुभाष घाई म्हणाले, “मला ताल सिनेमासाठी कोणती ब्यूटी क्वीन हवीच नव्हती, मला मानसी हवी होती, जी एका फार छोट्या शहरातील मुलगी आहे. ती तिच्या कौशल्याच्या आधारावर संघर्षमय आयुष्य बदलते. मी तेव्हा ऐश्वर्या राय हिला सांगितलं होतं, तुला बरबाद करुन ठेवेल. सिनेमासाठी तुला जास्त वेळ मेकअप करण्याची काहीही गरज नाही. मी दिग्दर्शक आहे तर माझ्यासाठी सिनेमातील प्रत्येक भूमिका महत्त्वाची आहे. तेव्हा मी फक्त माझ्या दिग्दर्शकाच्या भूमिकेबद्दल विचार केला.”

सुभाष घाई यांच्या ‘ताल’ चित्रपटातील ‘मानसी’ हे पात्र साधेपणाचे प्रतीक होते आणि ती एक कुशल नृत्यांगनाही होती. हे लक्षात घेऊन, घाई यांनी कोरिओग्राफर सरोज खान यांना विचारले की, माधुरी दीक्षितव्यतिरिक्त ही भूमिका कोण साकारू शकेल. सरोज खान यांचे उत्तर होते, ऐश्वर्या राय.

‘ताल’ हा एक उत्कृष्ट चित्रपट होता आणि त्याच्या यशाने सुभाष घाई यांचा आत्मविश्वास वाढवला. या चित्रपटात ऐश्वर्यासोबत अभिनेता अक्षय खन्ना झळकला होता. आता ‘ताल २’ (Taal 2) येण्याची शक्यता वर्तवली जात असून त्याबद्दल बरीच चर्चा रंगली आहे.

‘ताल’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास, त्यातील गाणी आजही चाहत्यांच्या मनावर कोरलेली आहेत. अनिल कपूर, ऐश्वर्या राय आणि अक्षय खन्ना यांच्याव्यतिरिक्त अमरीश पुरी आणि आलोक नाथ यांसारख्या कलाकारांनीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही