Share

जंतर-मंतर आंदोलनाचा ‘सीझन २’ लवकरच…; अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा

जंतरमंतर आंदोलन सीझन २ लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा अभिजीत दिपके यांनी करत अमित शाहांनी विद्यार्थ्यांवरील लाठीमार प्रकरणी संसदेत चर्चा करावी, अशी मागणी केली आहे.

Published On: 

Abhijit Dipke announce Jantar Mantar Season 2

Abhijit Dipke : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्जबाबत संसदेत चर्चा करावी. अमित शाह संसदेतून पळ काढत आहे, असा आरोप ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके (Abhijit Dipke) यांनी केला आहे.

दिपके यांनी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर होणाऱ्या आंदोलनाचे ‘सीझन २’ लवकरच सुरू होईल, अशी महत्त्वाची घोषणाही केली. इन्स्टाग्रामवर चाहते आणि समर्थकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी ही माहिती दिली.

जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनामुळे यापूर्वी धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ‘जंतरमंतर सीझन २’ लवकरच येत असल्याची मोठी घोषणा केली आहे.

Abhijit Dipke announce Jantar Mantar Season 2

अनेक लोक इन्स्टाग्राम कमेंट्समध्ये ‘सीझन २’ कधी येणार असे विचारत होते आणि त्यांना या प्लॅटफॉर्मद्वारे हे लवकरच होणार असल्याचे सांगायचे होते, असे दिपके यांनी नमूद केले.

नीट (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर, दिल्लीतील जंतरमंतरसह देशाच्या विविध भागांत विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती. CJP चे अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरवरील आंदोलनात विद्यार्थ्यांसोबत पालकही सहभागी झाले होते.

संसदेवर मोर्चाही काढण्यात आला होता. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. परिणामी, आंदोलक अधिक आक्रमक झाले आणि आंदोलनाची तीव्रता वाढली. अखेरीस, धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाबाबत दिपके काय म्हणाले?

याआधी, मंगळवारी अभिजीत दिपके यांनी झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचा निषेध केला होता. विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी लढा देत आहेत, ‘व्होट-बँक’च्या राजकारणासाठी नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होत नाही, पण केवळ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांवरच पोलिसांची कारवाई का होते?, असा प्रश्न दिपके यांनी उपस्थित केला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही