Share

पूर्वनियोजित भेट की नवे समीकरण? राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस या दोघांमधील भेट पूर्वनियोजित असल्याची माहिती समोर आली असून विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Published On: 

Raj Thackeray meets CM Fadnavis at Varsha

मुंबई : राज्यात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अशा परिस्थितीत, राज ठाकरे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे (Raj Thackeray) भाजपवर (BJP) जोरदार टीका करत आहेत आणि त्यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांनाही लक्ष्य केले आहे. मात्र, आज सकाळी त्यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे.

मनसे (MNS) आणि शिवसेना (Shivsena) ठाकरे गट एकत्र आल्यापासून राज ठाकरे यांनी अलीकडच्या काळात सरकारवरील टीकेची धार अधिक तीव्र केली आहे. काही दिवसांपूर्वीच एका सभेत त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांवरही टीका केली होती. छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या जिमखान्याच्या मुद्द्यात राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याचे समजते.

Raj Thackeray meets CM Fadnavis at Varsha

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक हे राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. राज ठाकरे सकाळी ८:०० वाजता ‘वर्षा’ येथे पोहोचले. ही भेट अचानक झाली. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनी अलीकडेच मुंबई-गोवा महामार्गाची स्वतः पाहणीही केली होती.

आता ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरही चर्चा करू शकतात. यापूर्वी ‘नीट’ (NEET) आंदोलनादरम्यान राज ठाकरे यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच त्यांनी नितीन गडकरी यांच्यावरही टीका केली आहे. भाजपवर सातत्याने टीका होत असतानाही, आता ते थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या टीकेवर आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कदाचित ही भेट छत्रपती शिवाजी महाराज पार्क जिमखान्याच्या मुद्द्याबाबत असल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय बोलतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील ही भेट पूर्वनियोजित होती. दोन दिवसांपूर्वीच याचे नियोजन करण्यात आले होते, ज्यानुसार ते आज सकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही