Share

‘मी तुमच्या पाठीशी आहे’; NDA खासदारांना मोदींचा विकासमंत्र

पंतप्रधान मोदींनी NDAतील नव्या खासदारांना आश्वस्त करत विकासकामांवर लक्ष देण्याचा सल्ला दिला आणि संसदेतील सततच्या गदारोळाबद्दल चिंता व्यक्त केली.

Published On: 

PM Modi with NDA MPs discussing Parliament and development

नवी दिल्ली: “काळजी करू नका. मी तुमच्या पाठीशी उभा आहे. तुमच्या मतदारसंघातील विकासकामांवर लक्ष केंद्रित करा” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शुक्रवारी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) नव्याने सामील झालेल्या खासदारांना (mps) दिलासा दिला.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच झालेल्या गोंधळाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. “सततच्या गदारोळामुळे, देशाला नव्याने निवडून आलेल्या आणि गुणवान खासदारांचे म्हणणे ऐकण्याची संधी मिळाली नाही,” असे निरीक्षण मोदींनी नोंदवले.

पंतप्रधान मोदींनी २० हून अधिक खासदारांसोबत नाश्त्यावर चर्चा केली. यामध्ये शिवसेना (यूबीटी) गटातून शिवसेनेत (शिंदे गट) आलेले सहा खासदार आणि तृणमूल काँग्रेस सोडून ‘नॅशनालिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’मध्ये (NCPI) सामील झालेले इतर खासदार यांचा समावेश होता.

PM Modi with NDA MPs discussing Parliament and development

या बैठकीला ४० हून अधिक खासदार उपस्थित होते. यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेच्या सदस्यांसह रिपब्लिकन पक्षाचे नेते व मंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह, अण्णाद्रमुक (AIADMK) नेते व राज्यसभा सदस्य एम. थंबीदुराई आणि युपीपीएल (UPPL) प्रमुख प्रमोद बोरो यांचा समावेश होता.

या नाश्त्याच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि नितीन नवीन जे दोघेही भाजपचे आजी-माजी अध्यक्ष आहेत. हे देखील उपस्थित होते. तृणमूल काँग्रेस सोडून भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील झालेले खलीलुर रहमान, युसूफ पठाण आणि अबू ताहिर खान हे देखील यावेळी उपस्थित होते.

“संसदेचे कामकाज सुरळीत चालण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. तसेच, संसदेत राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले,” असे शिवसेनेच्या राज्यसभा सदस्य ज्योती वाघमारे यांनी सांगितले.

शिंदे यांची पुन्हा मोदींशी भेट

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पुन्हा दिल्लीला भेट दिली आणि संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी औपचारिक प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मी पंतप्रधानांशी राज्याच्या विकासाबाबत चर्चा केली.”

मात्र, शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाबाबतच्या वादावर सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असताना झालेली ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे. महिला मतदारसंघांच्या पुनर्रचनेकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जाऊ नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही