Share

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर RBI मध्ये सरकारी नोकरीवर; पगार ऐकून थक्क व्हाल!

इशान किशन २०१७ पासून स्पोर्ट्स कोट्यातून RBI मध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे.

Published On: 

Ishan Kishan RBI assistant manager

मुंबई : टीम इंडियाचा (India Team) आक्रमक फलंदाज आणि यष्टिरक्षक इशान किशन (Ishan Kishan) अलीकडेच पाटण्यातील आरबीआयच्या (RBI) शाखेत दिसून आला. कार्यालयातील त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये तो आरबीआयचे ओळखपत्र (ID card) लावून कर्मचाऱ्यांसोबत फोटो काढताना दिसत आहे. मात्र, त्याला एका कर्मचाऱ्याच्या भूमिकेत पाहून चाहत्यांना खरोखरच आश्चर्य वाटले. तर आता इशान या शाखेत काय करतोय, याबद्दलचीही माहिती समोर आली आहे.

इशान किशन हा आरबीआयचा कर्मचारी आहे. अनेकांना त्याच्या या सरकारी नोकरीबद्दल माहिती नव्हती, त्यामुळे ही बाब समोर आल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटले. इशान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ‘सहाय्यक व्यवस्थापक’ (Assistant Manager) या पदावर कार्यरत आहे. २०१७ मध्ये ‘स्पोर्ट्स कोटा’ (क्रीडा कोट्या) अंतर्गत त्याची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

Ishan Kishan RBI assistant manager

निवडीच्यावेळी तो अवघ्या १८ वर्षांचा होता आणि एक उदयोन्मुख क्रिकेटपटू होता. त्याने ‘डी.वाय. पाटील ट्रॉफी’ (D.Y. Patil Trophy) सारख्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये आरबीआयचे प्रतिनिधित्व केले आहे. जेव्हा जेव्हा त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळतो, तेव्हा इशान बँकेला आवर्जून भेट देतो.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ‘सहाय्यक व्यवस्थापक’ (Assistant Manager) म्हणून काम करताना ईशान किशनला किती पगार मिळतो, याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. आरबीआयच्या पाटणा शाखेत सहाय्यक व्यवस्थापक या पदावर काम करताना, ईशान किशनचा मासिक पगार १ लाख ते १.४ लाख रुपयांच्या दरम्यान असू शकतो.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही