Share

‘Sorry Hrithik’ ट्रेंडवर अखेर हृतिक रोशनची पहिली प्रतिक्रिया; कंगना वादात उडी घेत म्हणाला…

कंगना रणौत वादादरम्यान सुरू असलेल्या ‘Sorry Hrithik’ ट्रेंडवर हृतिक रोशनने प्रतिक्रिया देत, केवळ रागाच्या भरात कुणाचीही बाजू घेऊ नका असा सल्ला दिला आहे.

Published On: 

Hrithik Roshan Reaction - Hrithik Roshan replies to Freddy Birdy on Sorry Hrithik trend.

कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि जेन झी (Gen Z) यांच्यात सुरू असलेल्या वादात आता चक्क हृतिक रोशनची (Hrithik Roshan) एन्ट्री झाली आहे, यावर तुमचा विश्वास बसेल का? होय, सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘सॉरी हृतिक’ (Sorry Hrithik) ट्रेंडवर अखेर हृतिकने स्वतःचं मौन सोडलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून NEET आणि कॉक्रोच जनता पार्टी (CJP) च्या मुद्द्यावरून कंगना रणौत आणि तरुणांमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. या सगळ्या गोंधळात नेटकऱ्यांनी अचानक २०१६ च्या कंगना-हृतिक वादाची आठवण काढत, ‘जगाने हृतिकची माफी मागायला हवी’ असा ट्रेंड सुरू केला. यावर हृतिकने अत्यंत सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

Hrithik Roshan On Kangana

इन्फ्लुएन्सर फ्रेडी बर्डी याने इन्स्टाग्रामवर ‘जगाने हृतिक रोशनची माफी मागायला हवी’ अशी पोस्ट केली होती. या पोस्टवर थेट कमेंट करत हृतिकने लिहिलंय, “माझ्या मित्रा, तुम्हाला आता ‘बी’ (कंगना) आवडत नाही, केवळ म्हणून ‘ए’ ची (माझी) बाजू घेणं हे आपल्या समाजातील एका मोठ्या समस्येचं लक्षण आहे. मी योग्य वेळ आणि तथ्यांची वाट पाहीन.”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, CJP चे प्रवक्ते सौरव दास यांनी नुकतंच कंगनावर निशाणा साधला होता. “मी तरुणपणीच्या हृतिकसारखा दिसतो, म्हणूनच ती माझ्यावर असा वैयक्तिक हल्ला करतेय का?” असा उपहासात्मक सवाल त्यांनी विचारला होता. यानंतरच सोशल मीडियावर मीम्स आणि जुन्या क्लिप्सचा अक्षरशः पूर आला आणि हृतिकला अचानक पाठिंबा मिळू लागला.

२०१६ मध्ये कंगना आणि हृतिक यांच्यात रिलेशनशिपवरून मोठा कायदेशीर वाद झाला होता. त्यावेळी हृतिकने आपले सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स तपासासाठी दिले होते, तर कंगनाने आपला लॅपटॉप पाण्यात भिजल्याचं कारण देत तो जमा केला नव्हता. अखेर पुराव्यांअभावी ही फाईल बंद झाली होती.

आता अचानक मिळालेल्या या नव्या पाठिंब्यावर हृतिक हुरळून गेलेला नाही. सोशल मीडियावरील भावनांपेक्षा तथ्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला त्याने नेटकऱ्यांना दिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही