Share

“बॉलिवूडमध्ये कुठे-कुठे तोंड काळं केलंय….”; कंगना रणौतची राखी सावंतने थेट लायकी काढली! नेमकं काय घडलं?

तरुणाईला ‘गटर जनरेशन’ म्हणणाऱ्या कंगना रणौतला राखी सावंतने खडेबोल सुनावले आहेत. ‘स्वतः कुठे तोंड काळं केलंय हे बघ,’ असं म्हणत राखीने संताप व्यक्त केलाय.

Published On: 

Rakhi Sawant angry reaction video on Kangana Ranaut comments

देशातील तरुणाईला थेट ‘गटर जनरेशन’ म्हणणाऱ्या कंगना रणौत (Kangana Ranaut) यांना आता बॉलिवूडमधूनच खुलं आव्हान मिळालं आहे. स्वतःला कडक सुरक्षेत ठेवून देशातल्या मुलींबद्दल वाटेल ते बोलण्याची हिंमत येते कुठून? असा थेट सवाल आता एका अभिनेत्रीनेच विचारला आहे.

भाजप खासदार कंगना रणौत यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता ड्रामाक्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) चांगलीच संतापली आहे. राखीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत कंगनाचा खरपूस समाचार घेतला असून, थेट तिच्या चारित्र्यावरच बोट ठेवलं आहे. त्यामुळेच आता या दोन अभिनेत्रींमधला वाद चव्हाट्यावर आला आहे.

Rakhi Sawant on Kangana Ranaut 

या व्हिडीओमध्ये राखीने अत्यंत आक्रमक शब्दांत कंगनाला खडेबोल सुनावले आहेत. चंदीगड विमानतळावरील त्या घटनेची आठवण करून देत, “तुला आणखी कानशिलात हव्या आहेत का? झेड सुरक्षेच्या बळावर काहीही बोलत आहेस, हिंमत असेल तर आमच्यासारखं एकटी फिरून दाखव,” असं थेट आव्हान राखीने दिलं आहे.

दुसरीकडे, देशातल्या मुलींवर टीका करणाऱ्या कंगनाने आधी स्वतःचं चारित्र्य तपासावं, असा घणाघातही राखीने केला. “बॉलिवूडमध्ये कुठे-कुठे तोंड काळं केलंय हे आधी बघ आणि मग देशातल्या मुलींवर बोल. माझ्या देशातल्या मुलींबद्दल बोलायची तुझी लायकी तरी आहे का?” असा संताप राखीने या व्हिडीओमधून व्यक्त केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीजेपी आंदोलनात जेन झी तरुणाईला यश मिळाल्यानंतर कंगनाने एक पोस्ट केली होती. यात तिने आजच्या पिढीतील महिलांना ‘जनरेशन गटर’ म्हटलं होतं. पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारणाऱ्या या मुली दारू पितात आणि अनेकांशी शारीरिक संबंध ठेवतात, अशी अत्यंत शेलक्या शब्दांत टीका कंगनाने केली होती. याच विधानावरून आता राखीने कंगनाला अक्षरशः धारेवर धरलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही