NEET Protest : पोलिसांची गाडी अडवणारी तरुणी कोण? VIDEO व्हायरल…

NEET पेपरफुटीविरोधातील मुंबईतील आंदोलनादरम्यान पोलिसांचे वाहन अडवणाऱ्या अभिनेत्री रिया अहिरची भूमिका देशभर चर्चेचा विषय ठरली आहे.

Published On: 

Riya Ahir

मुंबई: ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशभरातील विद्यार्थी आंदोलन (Student Protest) करत आहेत. मुंबईतही मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अशा आंदोलनांवर बंदी घालणारे आदेश लागू केले आहेत. असे असूनही, शहरातील विविध भागांत शेकडो विद्यार्थी दररोज आंदोलन करत आहेत आणि सरकारविरुद्ध आपला रोष व्यक्त करत आहेत. कालही मुंबईत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आंदोलन झाले. परवानगीशिवाय आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना एका वाहनात बसवले. मात्र, एका तरुणीने पोलिसांच्या वाहनासमोर ठामपणे उभे राहून पोलिसांना वाहन थांबवण्यास भाग पाडले. या घटनेने देशभर लक्ष वेधून घेतले असून, आता त्या तरुणीबद्दलची माहिती समोर आली आहे.

पोलिसांचे वाहन अडवणारी मुंबईतील ती तरुणी म्हणजे रिया अहिर (Riya Ahir) होय. रिया अहिर ही व्यवसायाने अभिनेत्री आणि मॉडेल आहे. गेल्या काही दिवसांपासून ती विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहे. काल जेव्हा पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले, तेव्हा तिचा संताप अनावर झाला. रियाने पुढे येऊन पोलिसांचे वाहन अडवताच, इतर नागरिकही मदतीसाठी पुढे आले आणि सर्वजण रस्त्यावर उतरले.

पोलिसांची कारवाई आणि सरकारबद्दल आपला संताप व्यक्त करताना रिया म्हणाली, “मला माहित आहे की पोलीस जे करत आहेत ते त्यांचे कर्तव्य आहे. पण ते त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत नाहीत. जर ते आपल्या नागरिकांची जबाबदारी घेऊ शकत नसतील, तर ती जबाबदारी आम्ही स्वीकारू. म्हणूनच मी पोलिसांचे वाहन अडवले. माझे वडील शेतकरी नाहीत आणि मी स्वतः शेतकरी, दलित किंवा ओबीसी नाही. पण त्या दिवशी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत जे केले ते चुकीचे होते. या कृत्यासाठी त्यांना जबाबदार धरलेच पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे.”

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही