दिल्ली : दिल्लीमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) द्वारे एका मोठ्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी देशभरातून तरुण दिल्लीत दाखल झाले आहेत. संसदेवर मोर्चा काढून निषेध नोंदवण्यावर ठाम असलेल्या हजारो संतप्त तरुणांना हटविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, CJP च्या प्रतिनिधींनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा (JP Nadda) यांची भेट घेऊन सरकारसमोर आपल्या मागण्या मांडल्या. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, सरकारने CJP च्या आंदोलनाला प्रतिसाद देत आंदोलकांना पहिले मोठे आश्वासन दिले आहे.
बैठकीत नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, CJP चे मुख्य प्रवक्ते आशुतोष रंका आणि सौरभ दास यांनी जे.पी. नड्डा यांची भेट घेतली आणि CJP व आंदोलकांच्या मागण्यांबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी या मागण्यांचा तपशील असलेले एक अधिकृत पत्रही केंद्र सरकारला सादर केले. CJP ने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि NEET परीक्षेतील अनियमिततेमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. सरकारने या विशिष्ट मागण्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कोणतेही फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार नाहीत
आंदोलनादरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा CJP च्या प्रतिनिधींनी निषेध केला. यावर प्रतिक्रिया देताना नड्डा यांनी त्यांना आश्वासन दिले की सरकार त्यांच्या मागण्यांचा विचार करेल. तसेच, आंदोलकांविरुद्ध कोणतेही फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार नाहीत, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावरून असे दिसून येते की सरकारने CJP च्या आंदोलनाची दखल घेतली आहे.
पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात
दरम्यान, परिस्थिती काहीही असली तरी आपले आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका आंदोलकांनी कायम ठेवली आहे. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ते ठाम आहेत. दुसरीकडे, आंदोलन संपवण्याच्या प्रयत्नात पोलीस आंदोलकांना ताब्यात घेत आहेत. आता या आंदोलनाच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! सोनम वांगचुक यांनी मागे घेतले उपोषण; जे. पी. नड्डांसोबतच्या चर्चेनंतर मोठा निर्णय
- ‘माझ्या बापानेही मला इतक्यांदा…..’; ५२ वर्षीय राम कपूरच्या ‘त्या’ कृतीवर श्रेयाचा संताप!
- सूपमध्ये झुरळ, फ्रिजमध्ये धक्कादायक प्रकार; तुकाराम मुंडेंचा नागपुरात मोठा दणका!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












