Share

मोठी बातमी! सोनम वांगचुक यांनी मागे घेतले उपोषण; जे. पी. नड्डांसोबतच्या चर्चेनंतर मोठा निर्णय

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवरील बेमुदत उपोषण मागे घेतले.

Published On: 

sonam wangchuk

दिल्ली : सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या उपोषणाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा (JP. Nadda) आणि कॉकरोच जनता पार्टीचे प्रतिनिधी यांच्यातील चर्चेनंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. वांगचुक २८ जूनपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत उपोषणावर बसले होते. AISA या विद्यार्थी संघटनेचे तीन सदस्य आणि इतर आंदोलकही या उपोषणात त्यांच्यासोबत सहभागी झाले होते. सरकारने चर्चेची प्रक्रिया सुरू केल्यानंतर हे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

वांगचुक यांच्या पत्नीचे निवेदन

रविवारी, सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांनी सांगितले की, जर राजकीय पक्षांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्वाचा मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन दिले, तर वांगचुक त्यांचे उपोषण मागे घेतील. यानंतर, वांगचुक यांनी आता आपले उपोषण मागे घेतले आहे.

सरकार आणि CJP यांच्यात चर्चेला सुरुवात

आज सोमवारी केंद्र सरकारने CJP सोबत चर्चेची प्रक्रिया सुरू केली. पक्षाचे प्रवक्ते सौरव दास आणि नेते आशुतोष रंका यांनी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत, ही आपली स्पष्ट भूमिका असल्याचे CJP ने सांगितले.

जे.पी. नड्डा यांनी चर्चेचा तपशील दिला

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे, “आज सकाळी, आंदोलकांच्या वतीने सरकारशी चर्चा करण्याचा प्रस्ताव पहिल्यांदाच प्राप्त झाला. आमची चर्चा सकाळी ११:५० पासून सुरू आहे. ही बैठक अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. आम्ही प्रथम त्यांच्या शिष्टमंडळाशी सविस्तर तोंडी चर्चा केली आणि दुपारी ४ च्या सुमारास त्यांनी मला लेखी निवेदनही सादर केले.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही