Share

सोनम वांगचुक यांना पोलिसांची बळजबरी अन् हृतिक रोशनची एन्ट्री; शत्रुघ्न सिन्हांचा सरकारला थेट सवाल

सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केल्यावर खळबळ उडाली आहे. आता हृतिक रोशन आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी वांगचुक यांना जाहीर पाठिंबा दिला.

Published On: 

Sonam Wangchuk protest support by Hrithik Roshan and Shatrughan Sinha

🕒 1 min read

नीट पेपरफुटीवरून (NEET Paper Leak) देशात किती विद्यार्थ्यांचे बळी जाणार आहेत? डॉक्टर किंवा इंजिनिअर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलांच्या भविष्याशी असा खेळ का सुरू आहे? असे संतप्त सवाल आता बॉलिवूडमधूनही विचारले जाऊ लागलेत.

गेल्या २० दिवसांपासून जंतर-मंतरवर आमरण उपोषणाला बसलेले शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केलं. या कारवाईनंतर मोठी खळबळ उडाली असून, अभिनेता हृतिक रोशन आणि ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी वांगचुक यांच्या समर्थनार्थ थेट मैदानात उडी घेतली आहे.

Sonam Wangchuk Protest

“एका चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारताना विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाची मला जाणीव झाली होती, ही परिस्थिती खरंच गंभीर आहे,” असं म्हणत हृतिक रोशनने आपली उद्विग्नता व्यक्त केली. त्याने वांगचुक यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात पेपरफुटीच्या नैराश्यातून २० हून अधिक विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा वांगचुक यांनी केला होता.

दुसरीकडे, ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पोलिसांच्या कारवाईवर सडकून टीका केली. वांगचुक यांना मध्यरात्री त्यांच्या कुटुंबीयांच्या संमतीशिवाय जबरदस्तीने रुग्णालयात नेल्याचा आरोप त्यांनी केला. “माननीय महोदय, ही लोकशाहीची पद्धत आहे का?” असा थेट सवाल करत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना यात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, आपली मुलगी सोनाक्षी हिने आधीच वांगचुक यांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी अभिमानही व्यक्त केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर पोलिसांनी जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वांगचुक २८ जूनपासून उपोषणाला बसले होते. आता या प्रकरणात दिग्गज सेलिब्रिटींनी आवाज उठवल्याने राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही