Share

मुंबई कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारला भीषण आग; धुरामुळे अडकले शेकडो प्रवासी

मुंबईच्या कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारला अचानक आग लागल्याने दाट धूर पसरला, प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आणि वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली.

Published On: 

Mumbai Costle Road

🕒 1 min read

मुंबई : मुंबईच्या कोस्टल रोडवरून (Mumbai Coastal Road) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज एका अत्यंत भीतीदायक आणि थरारक प्रसंगाचा सामना करावा लागला. कोस्टल रोडवरील बोगद्यातून जात असताना एका चालत्या गाडीला अचानक आग (Car Fire) लागली. गाडीने पेट घेताच त्यातून दाट काळा धूर बाहेर पडू लागला आणि संपूर्ण बोगदा व आसपासचा परिसर धुराने व्यापला गेला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि कोस्टल रोडवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. (Mumbai Traffic)

बोगद्यात भीतीचे वातावरण

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीला आग लागलेली पाहून आणि बोगद्यात धूर पसरल्याने गुदमरण्याची भीती वाटल्यामुळे, सुरक्षिततेचा उपाय म्हणून वाहनचालक आणि प्रवाशांनी आपली वाहने रस्त्यावरच सोडून दिली. लोक आपापल्या गाड्यांतून बाहेर पडून जीव वाचवण्यासाठी धावताना दिसले. बोगद्यासारख्या बंदिस्त जागेत आग लागल्यामुळे प्रवाशांमधील भीती अधिकच वाढली होती.

वाहने मागे घेणे अशक्य

ही घटना वाहतुकीच्या गर्दीच्यावेळी घडल्याने कोस्टल रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या गाडीच्या मागे असलेल्या वाहनचालकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या गाड्या मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रचंड वाहतूक आणि कोंडीमुळे चालकांना गाड्या मागे घेणे अशक्य झाले. परिणामी, अनेक नागरिक आपल्या गाड्यांसह बोगद्यातच अडकून पडले, तर काहींनी गाड्या सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आली. बोगद्यातील अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा आणि एक्झॉस्ट फॅन्स कार्यान्वित करण्यात आले असून, आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही