पार्थ पवार यांच्या साखरपुड्याची तारीख ठरली, रोहित पवारांनी शेअर केलेली ‘ती’ पत्रिका चर्चेत

पार्थ पवार २९ जुलै रोजी अभिनेत्री कायनात धार हिच्यासोबत साखरपुडा करणार आहेत. आमदार रोहित पवार यांनी पत्रिका शेअर करत शुभेच्छा दिल्या.

Published On: 

Parth Pawar Engagement card shared by Rohit Pawar on social media

पुणे – पवार कुटुंबात सध्या लागोपाठ सनई-चौघडे वाजणार आहेत, काही दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळे यांच्या कन्येचा विवाह पार पडल्यानंतर आता घरात आणखी एक गोड बातमी आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार असून त्यांच्या साखरपुड्याची तारीख आता समोर आली आहे. कायनात धार हिच्यासोबत पार्थ पवार यांची नवी इनिंग सुरू होणार आहे.

Parth Pawar Engagement Date

आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पार्थ पवार यांच्या साखरपुड्याची पत्रिका शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रोहित पवारांनी पोस्ट केलेल्या या पत्रिकेनुसार, येत्या २९ जुलै रोजी हा साखरपुडा पार पडणार आहे. “माझे प्रिय बंधू पार्थ आणि कायनात या दोघांना साखरपुड्याच्या मनापासून शुभेच्छा, तुमचा पुढील प्रवास आनंदाचा होवो,” अशा शब्दांत रोहित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दुसरीकडे, कायनात धार हिचे पवार कुटुंबाशी गेल्या काही काळापासून अत्यंत जवळचे संबंध असल्याचे पाहायला मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या रेवती सुळे यांच्या विवाह सोहळ्यात कायनात हिने सुनेत्रा पवार यांच्यासोबत हजेरी लावली होती, तेव्हापासूनच या चर्चांना उधाण आले होते.

काही महिन्यांपूर्वी पार्थ आणि कायनात यांनी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात जाऊन एकत्र दर्शन घेतले होते, त्याचे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. या नव्या बातमीमुळे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही