Share

Tamil Nadu Politics : तमिळनाडूत राजकीय उलथापालथ! मुख्यमंत्री विजय यांची सत्ताबळ मजबूत करण्याची खेळी?

तमिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, AIADMK च्या सहा आमदारांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री विजय यांची सत्ताबळ मजबूत करण्याची रणनीती चर्चेत आली आहे.

Published On: 

CM Thalapati Vijay

Tamil Nadu Politics : तमिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षातील फुटीनंतर आता त्याची झळ तमिळनाडूलाही बसताना दिसत आहे. विरोधी पक्ष असलेल्या एआयएडीएमके (AIADMK) मधील आणखी एका आमदाराने राजीनामा (MLA Resignation) दिल्याने आतापर्यंत पक्षातील सहा आमदारांनी विधानसभा सदस्यत्व सोडले आहे.

राजीनामा देणारे हे आमदार पुन्हा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. यातील काही जणांनी मुख्यमंत्री थलापती विजय (CM Thalapati Vijay) यांच्या नेतृत्वाखालील तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते एडप्पडी के. पलानीस्वामी (Edappadi K. Palaniswami) यांच्यासमोर मोठे राजकीय आव्हान निर्माण झाले आहे.

माजी परिवहन मंत्री आणि करूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार एम. आर. विजयभास्कर (M.R. Vijaybhaskar) यांनी सोमवारी राज्य सचिवालयात विधानसभा अध्यक्ष जे. सी. प्रभाकर (J.C. Prabhakar) यांची भेट घेत राजीनामा सुपूर्द केला. विधानसभा निवडणुकीनंतर AIADMK सोडणारे ते सहावे आमदार ठरले आहेत.

अलीकडील विधानसभा निवडणुकीत AIADMKला मोठा पराभव सहन करावा लागला. पक्षाची राज्यातील ताकद कमी झाल्यानंतर अंतर्गत असंतोष वाढला आहे. यापूर्वी चार आमदारांनी राजीनामा देत मुख्यमंत्री थलापती विजय यांच्या TVKमध्ये प्रवेश केला होता. आता आणखी आमदार पक्ष सोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एम. आर. विजयभास्कर यांनी यापूर्वी माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मंत्रिमंडळात परिवहन मंत्री म्हणून काम केले होते. 2021 च्या निवडणुकीत त्यांचा करूर मतदारसंघातून पराभव झाला होता, मात्र 2026 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय मिळवला. सहाव्या आमदाराच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू विधानसभेतील रिक्त जागांची संख्या सात झाली आहे. यामध्ये मुख्यमंत्री थलापती विजय यांनी रिक्त केलेल्या त्रिची ईस्ट मतदारसंघाचाही समावेश आहे.

थलापती विजय यांची सत्ताबळ मजबूत करण्याची खेळी?

तमिळनाडू विधानसभेत 234 जागा आहेत आणि बहुमतासाठी 118 आमदारांची गरज आहे. टीव्हीकेकडे 108 आमदार असून काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, व्हीसीके आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षांच्या पाठिंब्यामुळे सरकारकडे 120 आमदारांचे संख्याबळ आहे.

मात्र, भविष्यात काही मित्रपक्षांनी पाठिंबा काढल्यास सरकार अडचणीत येऊ शकते. त्यामुळे मुख्यमंत्री थलापती विजय विरोधी पक्षातील आमदारांना आपल्या गटात आणून सरकारचे संख्याबळ अधिक मजबूत करण्याच्या रणनीतीवर काम करत असल्याची चर्चा आहे. AIADMKमधील वाढती फूट पाहता आगामी काळात आणखी काही आमदार पक्ष सोडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही