🕒 1 min read
पुणे : जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर (Nasrapur Case) येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे (Bhimrao Kamble) याला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वागत केले असून, हा निकाल गुन्हेगारांसाठी कठोर संदेश असल्याचे म्हटले आहे. (Nasrapur Murder Case Verdict)
नसरापूर प्रकरणातील सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ गुन्हा मानून फाशीची शिक्षा सुनावली. या निकालानंतर राज्यभरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. महिला आणि बालकांविरोधातील गंभीर गुन्ह्यांवर कठोर कारवाईचा संदेश मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
शिंदेंनी केले न्यायालय आणि पोलिसांचे कौतुक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निकालाबाबत प्रतिक्रिया देताना न्यायालय, न्यायाधीश आणि पोलिसांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबाबत न्यायालयाने योग्य निर्णय दिला आहे. तसेच पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास पूर्ण करत अवघ्या दोन आठवड्यांत आरोपपत्र दाखल केले आणि महत्त्वाचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले, याचेही शिंदे यांनी कौतुक केले.
“गुन्हेगारांवर निश्चितच वचक बसेल”
शिंदे म्हणाले की, न्यायालयाने या प्रकरणाला ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ गुन्हा मानून कठोर शिक्षा दिली आहे. या निर्णयामुळे समाजातील गुन्हेगारांवर निश्चितच वचक बसेल आणि भविष्यात अशा अमानुष कृत्यांना आळा घालण्यास मदत होईल. “पुन्हा अशा प्रकारचे अमानुष कृत्य करण्याचे धाडस कोणी करणार नाही. अशा विकृत प्रवृत्तीला ठेचून काढले पाहिजे,” अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली.
जलद तपासामुळे मिळाला निकाल
या प्रकरणात पोलिसांनी वेगाने तपास करत वैज्ञानिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा केले. त्यानंतर न्यायालयात हे पुरावे सादर करण्यात आले आणि आरोपीविरोधातील आरोप सिद्ध झाल्यानंतर कठोर शिक्षा सुनावण्यात आली. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- Nasrapur Crime Case Verdict : ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ गुन्हा ठरला; आरोपीला फाशीची शिक्षा
- श्रद्धा कपूरचा ‘Eetha’ अडचणीत; विठाबाईंच्या कुटुंबीयांनी दिला निर्मात्यांना अल्टिमेटम
- Vat Purnima 2026 : सुवासिनींच्या श्रद्धेचा सण; जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











