Share

Nasrapur Crime Case Verdict : ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ गुन्हा ठरला; आरोपीला फाशीची शिक्षा

नसरापूर अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली असून, अवघ्या ६० दिवसांत खटल्याचा निकाल देत कठोर निर्णय घेतला आहे.

Published On: 

🕒 1 min read

Nasrapur Crime Case Verdict : नसरापूर येथे १ मे रोजी साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे (Bhimrao Kamble)याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा अंतिम फैसला आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयात (Pune District Sessions Court) झाला. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे (S.R. Salunkhe) यांनी सोमवारी या प्रकरणाचा अंतिम निकाल जाहीर केला.

या खटल्याची सुनावणी अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आली असून, गुन्हा घडल्यापासून अवघ्या ६० दिवसांच्या आत न्यायालयाने निकाल दिला आहे. तब्बल १३७ पानांचा हा निकाल आहे.

सातही गुन्हे सिद्ध; न्यायालयाने मानले ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ प्रकरण

विशेष न्यायालयाने यापूर्वी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले होते. त्यानंतर मृत्युदंड (Death Penalty) की जन्मठेप (Life Imprisonment) यावर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हे प्रकरण क्रूर स्वरूपाचे असून ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. आरोपीचे वय आणि मानसिक स्थिती हे शिक्षा कमी करण्यासाठी पुरेसे कारण नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

पोलिसांचा जलद तपास, भक्कम पुरावे

घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपीला अटक केली होती. तपासादरम्यान घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती, साक्षीदारांचे जबाब आणि वैद्यकीय अहवाल यांच्या आधारे आरोपीविरोधात मजबूत पुरावे सादर करण्यात आले. पोलिसांनी अल्पावधीत दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आणि अवघ्या दोन महिन्यांत हा खटला निकाली निघाला.

सरकार पक्षाचा युक्तिवाद

सरकार पक्षाच्या मते, आरोपीने नियोजनपूर्वक चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिची हत्या केली. त्यामुळे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

बचाव पक्षाचा दावा फेटाळला

बचाव पक्षाने सादर करण्यात आलेले पुरावे परिस्थितीजन्य असल्याचा दावा केला होता. तसेच हा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ श्रेणीत येत नसल्याचे न्यायालयात मांडण्यात आले. मात्र न्यायालयाने सर्व पुरावे आणि युक्तिवादांचा विचार करून आरोपीवरील आरोप सिद्ध झाल्याचे स्पष्ट केले.

न्यायालयाचा कठोर संदेश

शिक्षा सुनावताना न्यायालयाने सांगितले की, आरोपीविरोधातील सर्व सात गुन्हे सिद्ध झाले आहेत. देशातील यापूर्वीच्या अशाच प्रकरणांमधील निकालांचा आधार घेत न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही