Share

तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंसाठी लिहिलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाली, “आमच्यासाठी ती एक भावना…”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री तेजस्विनी पंडितने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली खास आणि भावुक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

Published On: 

Tejaswini Pandit Post: Marathi actress Tejaswini Pandit with MNS chief Raj Thackeray

🕒 1 min read

राजकारणातील एखाद्या नेत्यावर कलाकार इतक्या भरभरून प्रेमाचा वर्षाव करतात, हे दृश्य हल्ली फार दुर्मिळ होत चाललंय. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या बाबतीत मात्र चित्र नेहमीच वेगळं पाहायला मिळतं.

काल, १४ जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने सर्वच क्षेत्रांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. याच दरम्यान, मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) इन्स्टाग्रामवर शेअर केलेली एक अतिशय बोलकी पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

Tejaswini Pandit Post

तेजस्विनीने राज ठाकरेंसोबतचे काही खास फोटो शेअर करत आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. “तुमच्यासाठी राज ठाकरे हे नाव असेल फक्त, आमच्यासाठी ती भावना आहे,” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. साहेबांचं महत्त्व आपल्यासाठी आणि त्यांच्या मनात वसणाऱ्या प्रत्येकासाठी कधीच कमी होणार नाही, असा विश्वासही तिने व्यक्त केला.

महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंनी बघितलेलं स्वप्न लवकरच सत्यात उतरावं, अशी प्रार्थना तेजस्विनीने केली आहे. विशेष म्हणजे, राजकारणासारख्या अत्यंत रुक्ष वातावरणातही राज ठाकरेंनी स्वतःमधील संवेदनशीलता जपावी, अशी सदिच्छा तिने दिली.

लक्षवेधी बाब म्हणजे, या पोस्टच्या शेवटी एका फोटोवर तिने ‘समय प्रसंग ओळखावा, राग निपटुनी काढावा. आला तरी कळो न द्यावा, जनांमध्ये.’ ही अतिशय सूचक ओळ लिहिली आहे.

तेजस्विनीच्या या भावुक पोस्टला चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. अभिनेता स्वप्निल जोशीने ‘राजा माणूस’ अशी दाद दिली आहे, तर कुशल बद्रिके आणि पुष्कर जोग यांसारख्या अनेक कलाकारांनीही यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही