पुणे – शेकडो महिलांचं लैंगिक शोषण करणारा भोंदूबाबा अशोक खरात जेलमध्ये आहे, पण त्याच्या नावाने राजकारणात नेमक्या कुणाकुणाच्या विकेट्स पडतायत? हा प्रश्न आता नव्याने चर्चेत आलाय. एकाचे राजीनामे घेतले जातायत आणि दुसऱ्याच्या घरात नवी पदं वाटली जातायत, अशी उघड चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अशोक खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांना महिला आयोग आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण या सगळ्या राजीनामा नाट्यामागे मोठा ‘पॉलिटिकल गेम’ असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. कालच अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. यावरूनच पवारांनी (Rohit Pawar) थेट तटकरेंवर निशाणा साधलाय.
रोहित पवारांचा दावा आणि खरात प्रकरणातील राजकीय गेम
सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांतील नेत्यांचा या खरात प्रकरणात थेट संबंध आहे. तरीही टार्गेट फक्त एकाच व्यक्तीला का केलं गेलं, असा खडा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. त्यांनी गुवाहाटीच्या माँ कामाख्या देवीच्या दौऱ्याचा थेट संदर्भ दिला आहे.
रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, माँ कामाख्या देवीच्या दर्शनाला गेलेल्यांपैकी एका व्यक्तीची दोन्ही पदं गेली. दुसरीकडे, राजकीय वजन जास्त असलेला नेता मात्र यातून सहीसलामत सुटला. त्यांच्याच घरात आधीच खासदारकी आणि मंत्रिपद असताना आता आमदारकीही आली. रुपाली चाकणकर खरातला गुरू मानायच्या आणि २०२१ मध्ये त्यांनी खरातसोबत गुवाहाटी दौरा केला होता. याच दौऱ्याचा धागा पकडत पवारांनी थेट सत्तेतील मोठ्या नेत्यांवर बोट ठेवलंय. त्यामुळे खरात प्रकरणात अजून किती नावं दडली आहेत, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- जेवणात भेसळ किंवा गुटखा विक्री दिसल्यास थेट तुकाराम मुंढेंना करा कॉल, कारवाईचा धडाका सुरू
- बॉक्स ऑफिसवर १८०० कोटी लुटणारा ‘धुरंधर २’ अखेर OTT वर; थिएटरमध्ये न दिसलेले सीनही पाहायला मिळणार?
- ‘माझी २० वर्षे महाराष्ट्रात गेली पण…’, भर कार्यक्रमात कंगना रनौत मराठी अभिनेत्रींबाबत नेमकं काय म्हणाली?













