गरोदर महिलांच्या बँक खात्यात थेट येणार ५००० रुपये; जाणून घ्या घरबसल्या अर्ज करण्याची सोपी पद्धत!

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत गरोदर महिलांना पोषक आहारासाठी ५००० ते ११००० रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. जाणून घ्या अर्जाची सोपी प्रक्रिया.

Published On: 

PMMVY Scheme details - Pregnant woman receiving government benefits

गरोदरपणात महिलांच्या (pregnant women benefits) आहाराचा आणि आरोग्याचा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न अनेक कुटुंबांना सतावतो. पण तुम्हाला माहितीये का, याच काळजीपोटी सरकार आता गरोदर महिलांना थेट ५,००० रुपयांची आर्थिक मदत देत आहे?

केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजने’अंतर्गत (PMMVY scheme) महिलांना हा मोठा दिलासा दिला जात आहे. गरोदर आणि स्तनदा मातांना योग्य पोषण मिळावं आणि त्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. हे पैसे थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे बँक खात्यात जमा केले जातात.

PMMVY Scheme Benefits

योजनेच्या अधिकृत नियमांनुसार, पहिल्या अपत्यासाठी मिळणारी ५००० रुपयांची रक्कम दोन टप्प्यांत विभागली जाते. गरोदरपणाची नोंदणी करून तपासणी केल्यावर पहिला ३००० रुपयांचा हप्ता मिळतो. त्यानंतर बाळाच्या जन्मानंतर उरलेले २००० रुपये खात्यात जमा होतात.

दुसरीकडे, जर तुमचं दुसरं अपत्य मुलगी असेल, तर योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर थेट ६००० रुपये एकरकमी दिले जातात. त्यामुळे एका पात्र महिलेला एकूण ६,००० ते ११,००० रुपयांपर्यंतचा मोठा आर्थिक आधार मिळू शकतो.

या योजनेचा फायदा घेण्यासाठी काही अटी पूर्ण करणं आवश्यक आहे. महिलेचं वय किमान १९ वर्षे असावं आणि कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावं. तुमच्याकडे मनरेगा कार्ड, ई-श्रम कार्ड, बीपीएल रेशन कार्ड असेल किंवा तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्ही सहज या योजनेसाठी पात्र ठरता.

अधिकृत आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशभरातील तब्बल ४ कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून सरकारने यासाठी १९,०२८ कोटी रुपये वितरित केले आहेत.

यासाठी अर्ज करणं अत्यंत सोपं आहे. पात्र महिलेला बाळाच्या जन्मानंतर २७० दिवसांच्या आत ‘pmmvy.wcd.gov.in’ या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो. तसेच, जवळच्या अंगणवाडीत किंवा सरकारी रुग्णालयात जाऊनही तुम्ही थेट नोंदणी करू शकता. यासाठी बँक खात्याशी जोडलेले आधार कार्ड, बँक पासबुक आणि एमसीपी कार्ड जवळ असणं आवश्यक आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही