Share

गुलाबराव पाटलांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी अशीच चालली तर महायुतीचं पुढे काय होणार?

विधानपरिषद निवडणुकीत मित्रपक्षाकडून होत असलेल्या बंडखोरीवरून गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला असून, महायुतीच्या भविष्याबाबत भाजपला सूचक इशारा दिला आहे.

Published On: 

Mahayuti Internal Conflict Gulabrao Patil warns BJP over rebellion

मुंबई – “आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो, तर आज राज्यात तुमची सत्ता असती का?” हा थेट सवाल करत शिंदे गटाच्या एका मंत्र्याने मित्रपक्षालाच आरसा दाखवला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. जळगावची जागा भाजपने घेतल्याने पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील चांगलेच संतापले असून, त्यांनी थेट महायुतीच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

अब्दुल सत्तारांची नाराजी दूर झाली असली, तरी गुलाबराव पाटील मात्र अजूनही आक्रमक भूमिकेत आहेत. “आम्ही गुवाहाटीचा उठाव केला नसता तर आज काय स्थिती असती?” अशी आठवण करून देत मोठ्या भावाने लहान भावाकडे नीट लक्ष द्यावं, असा सल्ला त्यांनी भाजपला दिला.

Mahayuti Internal Conflict

गुलाबराव पाटील जळगावच्या जागेवरून नाराज आहेत. आमच्या हक्काच्या ५ पैकी ४ जागांवर आम्ही समाधान मानलं, तरी तिथेही बंडखोरी होत असेल तर हा आमच्यावर मोठा अन्याय आहे, असं ते उघडपणे म्हणाले. कमी जागा घेऊनही अशा बंडखोऱ्या होणार असतील तर हे युतीच्या भविष्यासाठी अत्यंत चुकीचे आहे.

“दोघांनी प्रामाणिकपणे काम केलं तरच महायुती चालेल. कार्यकर्त्यांना जिवंत ठेवायचं असेल तर बंडखोरी टाळायलाच हवी,” असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. जळगावमध्ये बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई न होता प्रभाकर गोटू सोनवणे यांना चार वेळा पक्षात प्रवेश दिल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी बोलून दाखवली.

नाशिकमधील भाजपच्या बंडखोरीवरून पाटील यांनी गिरीश महाजनांनाही खोचक टोला लगावला. नाशिकची जबाबदारी महाजनांकडे आहे, ते नक्की तोडगा काढतील. पण कुणाच्या मनात काय चाललंय हे कसं सांगणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दुसरीकडे, दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चेवर बोलताना पाटील म्हणाले की, अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवे हे गेल्या २५ वर्षांचे जुने मित्र आहेत, त्यांच्या भेटीत गैर काय? संजय राऊतांनीच आम्हाला बाहेर काढलं आणि आता तेच पुन्हा मातोश्रीवर बोलावताहेत, असा पलटवारही त्यांनी केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही