प्रतिनिधी, 23 ऑक्टोबर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या काही महिन्यांत देशात मोठी गडबड होण्याच्या केलेल्या दाव्याला मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देशात गडबड करणारा अद्याप कुणी जन्माला यायचा आहे. हे नरेंद्र मोदींचे सरकार असून, कोणी गडबड केल्यास आम्ही थेट पाकिस्तानात जाऊन ठोकतो, अशा शब्दांत पाटील यांनी ठाकरेंना आव्हान दिले आहे.
देशातील निवडणुका पारदर्शक व्हाव्यात, अशी मागणी करत राज ठाकरे यांनी ईव्हीएमला कडाडून विरोध केला होता. नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका होतात, तर फ्रान्समध्ये एका व्यक्तीच्या सांगण्यावरून तशी निवडणूक घेण्यात आली. मग संपूर्ण जगाने ईव्हीएम नाकारले असताना भारतात त्याचा वापर का, असा सवाल त्यांनी विचारला होता. पुढील ४ ते ५ महिन्यांत देशात काहीतरी मोठी गडबड होईल, देश रस्त्यावर आला तरी आश्चर्य वाटणार नाही आणि देशाला पंतप्रधान उरणार नाहीत, असे भाकीत त्यांनी वर्तवले होते. या विधानावरून गुलाबराव पाटील यांनी पलटवार केल्याने आता राजकीय वाक्युद्ध सुरू झाले आहे.
दसरा मेळाव्यातील भाषणावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले. राऊत म्हणजे एक ‘वापरलेली कॅसेट’ असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. प्रत्येकाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटते, यात आपली भूमिका मांडण्यात चूक काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कार्यकर्त्यांची इच्छा असल्यानेच आपण आमदार आणि मंत्री झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. सरकार आणि जनतेने एकत्रित नियोजन केल्यास दुष्काळाला प्रभावीपणे सामोरे जाता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुष्काळाला संकट न मानता संधी समजून नाला खोलीकरण आणि सिमेंट प्लग बांधण्यासारखी कामे करता येतील. राज्यात सध्या ‘जलतारा’ उपक्रम राबवला जात असून, याअंतर्गत भूजल पातळी वाढवण्यासाठी जळगाव जिल्ह्यात २५ हजार कामे हाती घेतली जाणार आहेत. १९७२ च्या दुष्काळातून जशी ‘रोजगार हमी योजना’ जन्माला आली, तसाच आताही दुष्काळाचा सामना करण्यासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागेल, असेही त्यांनी नमूद केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- १०० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंची यादी; अर्शदीप सिंगची खास क्लबमध्ये एन्ट्री
- न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये अभिषेक शर्माकडून सोपा झेल सुटला, चाहते म्हणाले ‘हा तर दुसरा बाबर आझम’
- भुवनेश्वर कुमारचं निराशाजनक पुनरागमन; ४ वर्षांपूर्वीच्या शेवटच्या टी-२० सामन्यापेक्षाही खराब कामगिरी
Quick Answers
पुढील ४ ते ५ महिन्यांत देशात काहीतरी मोठी गडबड होईल, देश रस्त्यावर आला तरी आश्चर्य वाटणार नाही आणि देशाला पंतप्रधान उरणार नाहीत, असे भाकीत राज ठाकरे यांनी वर्तवले होते.
देशात गडबड करणारा अद्याप कुणी जन्माला यायचा आहे, हे नरेंद्र मोदींचे सरकार असून कोणी गडबड केल्यास थेट पाकिस्तानात जाऊन ठोकू, असे प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी दिले.
गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांना एक 'वापरलेली कॅसेट' म्हटले.
'जलतारा' उपक्रमांतर्गत भूजल पातळी वाढवण्यासाठी जळगाव जिल्ह्यात २५ हजार कामे हाती घेतली जाणार आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








