🕒 1 min read
एखादा अभिनेता पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारणार म्हणून त्याचेच चाहते इतके संतापू शकतात, यावर तुमचा विश्वास बसेल का? सध्या सोशल मीडियावर इम्रान हाश्मीच्या (Imran Hashmi) चाहत्यांनी घेतलेल्या एका आक्रमक भूमिकेमुळे सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण समोर येऊन दोन महिने झाले, तरी या प्रकरणाची चर्चा काही थांबलेली नाही. आता याच खरातच्या काळ्या कारनाम्यांवर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स’ नावाचा एक नवा चित्रपट येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Imran Hashmi Maharashtra Epstein Files
पण या चित्रपटात मुख्य भोंदूबाची भूमिका बॉलिवूडचा ‘सिरियल किसर’ इम्रान हाश्मी साकारणार असल्याची चर्चा सुरू होताच चाहत्यांचा पारा चांगलाच चढलाय. सध्या सोशल मीडियावर इम्रान हाश्मीच्या फॅन पेजेसवरून एक पोस्ट तुफान व्हायरल होतेय. या पोस्टमध्ये चाहत्यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्याला अशा प्रकारची भूमिका न करण्याचा थेट सल्ला दिला आहे.
“इम्रानचे खरे चाहते म्हणून आमची अशी अजिबात इच्छा नाही की त्याने इतके गंभीर आणि घाणेरडे आरोप असलेल्या व्यक्तीचं पात्र पडद्यावर साकारावं,” असं चाहत्यांनी उघडपणे म्हटलं आहे. त्यामुळेच आता या भूमिकेवरून नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडलेत.
दुसरीकडे, या वादग्रस्त चित्रपटात फक्त खरातच नाही, तर राजकीय वर्तुळातील चेहरेही दिसणार असल्याचं समजतंय. या संपूर्ण प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नाव जोडलं गेलं होतं.
त्यामुळे चित्रपटात त्यांच्याशी साधर्म्य असलेलं एक पात्र असणार असून, ही भूमिका अभिनेत्री दीपाली सय्यद साकारणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाची कथा अत्यंत संवेदनशील विषयावर आधारित असल्याने कलाकारांच्या निवडीबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
खरातवर झालेल्या गंभीर आरोपांमुळे इम्रानच्या चाहत्यांनी आधीच नाराजीचा पाऊस पाडायला सुरुवात केलीय. त्यामुळेच आता या मुख्य भूमिकेसाठी दिग्दर्शक खरोखरच इम्रानला फायनल करणार की चाहत्यांच्या दबावामुळे दुसरा चेहरा शोधणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- गिरीजा ओकच्या निळ्या साडीतील लूकवर कंगना राणौतची मोठी प्रतिक्रिया; म्हणाली, “तुझ्या सौंदर्याचा…”
- सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; ‘सेक्स वर्कर’ महिलांना अटक करता येणार नाही, पोलिसांना कडक इशारा!
- मान्सून लांबणीवर; हवामान विभागाची धक्कादायक माहिती अन् शेतकऱ्यांवर दुष्काळाची टांगती तलवार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












