Share

देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर, पण एक मोठी अट!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत ५६ लाख शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मंजूर करण्यात आली आहे.

Published On: 

Farmer Loan Waiver Devendra Fadnavis in cabinet meeting approving agriculture scheme

मुंबई– विधानसभेच्या निकालानंतर शेतकरी ज्या एका बातमीची चातकासारखी वाट पाहत होते, ती अखेर आली आहे. राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी सुरू असतानाच, बळीराजासाठी एक खरोखरच मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या कॅबिनेट बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असून, त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा मोठा बोजा हलका होणार आहे.

Maharashtra Farmer Loan Waiver updates

पण, थांबा! निर्णय जरी झाला असला तरी सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळेच या कर्जमाफीची अधिकृत घोषणा करण्यासाठी सरकारला थोडी वाट पाहावी लागणार आहे. आचारसंहिता संपताच याची थेट अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे नुकताच सोपवला. त्याच अहवालावर चर्चा करून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.

या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजने’अंतर्गत तब्बल ५६ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांवर दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आहे, ते सरकारकडून माफ केले जाणार आहे.

दुसरीकडे, जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करतात, त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. अशा नियमित कर्जदारांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहनपर निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा भार पडणार आहे. तब्बल ६५ लाखांवर कर्जखाती या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. आता सहकार विभाग लवकरच याबाबतच्या अटी आणि शर्तींचे परिपत्रक काढणार आहे, ज्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install