Share

देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; लाडकी बहीण योजनेचे पैसे ‘यांच्या’ खिशातून वसूल करणार!

लाडकी बहीण योजनेत फसवणूक करून लाभ घेणाऱ्या १४ हजार पुरुषांकडून सरकार पैसे वसूल करणार असून, पात्र महिलांसाठी केवायसी विंडो पुन्हा उघडली जाईल.

Published On: 

Devendra Fadnavis reaction on 80 lakh women disqualified from Ladki Bahin Yojana

🕒 1 min read

मुंबई – महिलांसाठी सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे चक्क पुरुषांनी लाटले आहे. या योजनेचा लाभ घेणारे चक्क १४ हजार पुरुष आढळून आले आहेत. फसवणूक करून महिलांच्या हक्काचे पैसे लाटणाऱ्या या पुरुषांना सरकार अजिबात सोडणार नसून, त्यांच्याकडून घेतलेला सर्व पैसा कडकपणे वसूल करणार असल्याचा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

दुसरीकडे, या योजनेतून तब्बल ८० लाख महिला अपात्र ठरल्याचे समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात अचानक राजकारण तापलं आहे. विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला असतानाच, फडणवीस यांनी थेट पत्रकार परिषद घेत यावर स्पष्ट भूमिका मांडली.

Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana

फडणवीस यांनी सांगितलं की, जेव्हा सरकारी तिजोरीतून एवढा मोठा पैसा खर्च होतो तेव्हा त्याचं सीएजी ऑडिट करणं कायद्यानुसार बंधनकारक असतं. अपात्र ठरलेल्या खऱ्या महिला भगिनींकडून मात्र कोणताही पैसा सरकार परत घेणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली. केवळ शासकीय निकषांची पूर्तता न झाल्यामुळेच आणि अर्जातील त्रुटींमुळे या महिलांचे १५०० रुपये सध्या बंद झाले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनीही यात अर्ज केल्याचे समोर आले आहे.

या डिजिटल तपासणीत सुमारे ४ ते ५ लाख लाभार्थी असे निघाले ज्यांच्या घरात स्वतःची चारचाकी गाडी आहे. तसेच अनेकांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचंही स्पष्ट झालं आहे.

अनेकांचे अर्ज बाद झाल्याने ही अपात्र ठरलेल्यांची संख्या ८० लाखांवर पोहोचली आहे. ही केवळ तांत्रिक त्रुटी असून निकषात बसणाऱ्या महिलांनी घाबरण्याची गरज नाही. दुसरीकडे, सर्व शासकीय निकष पूर्ण करणाऱ्या सुमारे १ कोटी ७० लाख महिलांना मात्र नियमितपणे पैसे मिळत राहतील.

ज्या खऱ्या आणि पात्र भगिनी काही तांत्रिक कारणांमुळे किंवा केवायसी न झाल्यामुळे योजनेपासून दूर राहिल्या आहेत, त्यांच्यासाठी सरकार पुन्हा एकदा नवीन विंडो ओपन करणार आहे. त्यामुळे पात्र महिलांनी अजिबात काळजी करण्याची गरज नाही, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!