Share

प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ची आयपीएल फायनललाही हवा, कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क!

आयपीएलच्या अंतिम सामन्याचा फटका न बसता प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ सिनेमाने 11 दिवसांत 50 कोटींचा टप्पा पार करत इतिहास रचला आहे.

Published On: 

Deool Band 2 Box Office Collection Pravin Tarde and Mohan Joshi movie success

आयपीएलच्या फायनल दिवशी भलेभले सिनेमे बॉक्स ऑफिसवर पाणी मागतात, पण एका मराठी सिनेमाने मात्र याच दिवशी थिएटरबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकवलेत, यावर तुमचा विश्वास बसेल का? होय, हे अगदी खरं आहे.

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ (Deool Band 2) या चित्रपटाने सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रविवारी एका बाजूला आयपीएलच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला असताना, दुसरीकडे स्वामीभक्तांनी थेट थिएटरबाहेर गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Deool Band 2 Box Office Collection 

या ऐतिहासिक प्रतिसादावर स्वतः दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मोकळेपणाने संवाद साधला आहे. “आयपीएलच्या फायनल दिवशी भलेभले लोक आपला सिनेमा लावायला घाबरतात, तिथे आपला ‘देऊळ बंद 2’ संपूर्ण महाराष्ट्रात हाऊसफुल्ल सुरू आहे,” अशी अभिमानास्पद प्रतिक्रिया त्यांनी दिली.

या घवघवीत यशामागे कोणतंही मोठं कॉर्पोरेट चॅनेल किंवा मोठी कंपनी नसून, एका सामान्य प्रोड्युसरने हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवला आहे, हा मोठा गौप्यस्फोटही तरडेंनी यावेळी केला. दोन आठवड्यांतच सिनेमाने पन्नास कोटींचा टप्पा ओलांडला असून ही केवळ स्वामींची कृपा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

चित्रपटाची मुख्य अभिनेत्री आणि तरडेंची पत्नी स्नेहल तरडे हिनेही या भरघोस प्रेमाबद्दल प्रेक्षकांचे जाहीर आभार मानले आहेत. कमाईचा विचार केला तर, ‘देऊळ बंद 2’ ने अवघ्या 11 दिवसांत 50.15 कोटी रुपयांचा गल्ला जमवून बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे.

सध्या रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमानंतर मराठी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत याने थेट सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे सर्वत्र फक्त याच सिनेमाची चर्चा आहे.

अकरा वर्षांपूर्वी आलेल्या ‘देऊळ बंद’च्या या दुसऱ्या भागात शेतकरी आत्महत्येसारखा अत्यंत ज्वलंत आणि गंभीर प्रश्न मांडण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेत झळकले असून, त्यांचा स्क्रीनवरील वावर प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घालत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install