मविआची यादी आली, पण एकाच जागेवर शरद पवार गटाचे दोन अर्ज आल्याने सस्पेन्स वाढला!

विधान परिषदेसाठी काँग्रेसने ५ उमेदवार जाहीर केले आहेत, तर सातारा-सांगलीत शरद पवार गटाकडून दोन उमेदवारांचे अर्ज भरले जात असल्याने खळबळ उडाली आहे.

Published On: 

Vidhan Parishad Election nomination process and MVA candidate updates.

पुणे – विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक असा काही हायव्होल्टेज ड्रामा घडेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. महायुतीने आधीच मोर्चेबांधणी पूर्ण केलेली असताना आता महाविकास आघाडीनेही आपले पत्ते उघडले आहेत. पण सर्वात मोठी खळबळ उडाली आहे ती सातारा-सांगली मतदारसंघात, जिथे एकाच जागेसाठी शरद पवार गटाकडून दोन दोन उमेदवारांचे अर्ज दाखल होत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या १७ जागांसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट आणि अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेसने आपल्या वाट्याच्या जागांचे उमेदवार फायनल केले असले, तरी काही जागांवर अद्यापही सस्पेन्स कायम ठेवला आहे.

MVA Candidate List Vidhan Parishad Election

काँग्रेसने अखेर आपल्या पाच उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये चंद्रपूर-वर्धा मतदारसंघातून शैलेश देशमुख, अमरावतीतून हर्षदीप देशमुख, यवतमाळमधून साहेबराव कांबळे, लातूरमधून महेश देशमुख आणि सोलापूरमधून आदित्य फत्तेपूरकर यांना लॉटरी लागली आहे. दुसरीकडे अहमदनगर, नागपूर आणि भंडाऱ्यातील नावांवर अजूनही अंतिम शिक्कामोर्तब झालेलं नाही.

दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सातारा-सांगली मतदारसंघात मोठा पेच निर्माण केला आहे. इथून अभय जगताप आणि बाळासाहेब पाटील हे दोन्ही नेते अर्ज भरणार आहेत. अभय जगताप यांच्या खांद्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाल्याने ते रुग्णालयात आहेत, त्यामुळे ते निवडणूक लढवणार की नाही यावर संभ्रम आहे. ऐनवेळी गोंधळ नको म्हणून दोन्ही अर्ज भरून नंतर एक मागे घेतला जाण्याची शक्यता आहे.

महायुतीने यापूर्वीच आपली तगडी फौज मैदानात उतरवली आहे. भाजपने प्राजक्त तनपुरे (अहिल्यानगर), सुहास शिरसाट (छत्रपती संभाजीनगर-जालना), अमर राजूरकर (नांदेड) आणि अरुण लखाणी (वर्धा-चंद्रपूर) यांच्यासह ११ नावांची घोषणा केली आहे.

तर शिंदे गटाने नाशिकमधून नरेंद्र दराडे आणि ठाण्यातून रवींद्र फाटक यांना मैदानात उतरवलं आहे. राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे रायगडमधून नशीब आजमावत आहेत. दोन्ही बाजूंचे तगडे उमेदवार समोरासमोर आल्याने आता या १७ जागांच्या लढाईत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून राजकारण चांगलंच तापलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही