Share

विराट कोहलीचा फायनलमध्ये धमाका, वैभव सूर्यवंशीने मारली मोठी बाजी!

आरसीबीने गुजरातचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. विराटने ७५ धावा कुटल्या, तर वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक बक्षिसे जिंकली.

Published On: 

IPL 2026 Final RCB players celebrating victory with Virat Kohli.

🕒 1 min read

IPL 2026 Final | आयपीएलची फायनल आणि त्यात किंग कोहलीचा धमाका नसता तरच नवल, नाही का? सलग दुसऱ्यांदा आरसीबीने आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं असून गुजरात टायटन्सला त्यांच्याच खेळात चारीमुंड्या चित केलं आहे. रविवारी झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी आधी गुजरातला रोखलं आणि नंतर फलंदाजांनी विजयाचा कळस चढवला.

गुजरातने दिलेलं १५५ धावांचं माफक आव्हान आरसीबीने पाच गडी राखून सहज पूर्ण केलं. या संपूर्ण सामन्यात विराट कोहलीच्या ७५ धावांची खेळी निर्णायक ठरली. तर दुसरीकडे, एका भन्नाट युवा खेळाडूने फायनलमध्ये नसूनही सर्व बक्षिसांवर एकहाती डल्ला मारत मोठी खळबळ उडवून दिली आहे.

IPL 2026 Final RCB Won Trophy Virat Kohli

आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. गुजरातची सुरुवातच खूप निराशाजनक झाली. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने शुभमन गिलला अवघ्या १० धावांवर तंबूत पाठवलं. तर भुवनेश्वर कुमारने साई सुदर्शनची १२ धावांवर शिकार केली.

त्यामुळेच गुजरातचा डाव सावरण्याची जबाबदारी निशांत सिंधू आणि जोस बटलरवर आली. पण त्यांच्या संथ फलंदाजीमुळे मोठी धावसंख्या उभारण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले. गुजरातला निर्धारित षटकात केवळ १५५ धावांपर्यंत मजल मारता आली.

या लक्ष्याचा पाठलाग करताना कोहली आणि दुखापतग्रस्त व्यंकटेश अय्यरने ६२ धावांची भक्कम सलामी दिली. अय्यर ३२ धावांवर बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार आणि कृणाल पांड्या लागोपाठ स्वस्तात माघारी परतले. एका क्षणी आरसीबीवर दबाव आला होता.

पण किंग कोहलीने एका बाजूने किल्ला खंबीरपणे लढवला. अवघ्या ४२ चेंडूंत ९ खणखणीत चौकार आणि ३ उत्तुंग षटकार ठोकत त्याने विजयावर शिक्कामोर्तब केलं. या दिमाखदार विजयामुळे चॅम्पियन आरसीबीला तब्बल २० कोटी रुपये, तर उपविजेत्या गुजरातला १२.५ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले.

दुसरीकडे, या संपूर्ण हंगामात वैभव सूर्यवंशी या युवा खेळाडूने क्रिकेट वर्तुळात अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याने ऑरेंज कॅपसोबतच ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’, ‘इमर्जिंग प्लेयर’ आणि ‘सुपर स्ट्रायकर’ असे सर्वच मोठे किताब पटकावले. या पठ्ठ्याला सिएरा कार आणि ४५ लाखांची घसघशीत रक्कम मिळाली आहे.

IPL 2026 अवॉर्ड्स लिस्ट

विजेते : RCB- 20 कोटी रुपये

उपविजेते : GT- 12.5 कोटी रुपये

मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीजन : वैभव सूर्यवंशी- 15 लाख रुपये

ऑरेंज कॅप : वैभव सूर्यवंशी- 10 लाख रुपये

पर्पल कॅप: कगिसो रबाडा- 10 लाख रुपये

इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीजन- वैभव सूर्यवंशी- 10 लाख रुपये

सर्वात जास्त डॉट बॉल: मोहम्मद सिराज- 10 लाख रुपये

सुपर स्ट्रायकर ऑफ द सीजन: वैभव सूर्यवंशी- सिएरा कार

सर्वात जास्त षटकार ( सिक्स) : वैभव सूर्यवंशी- 10 लाख रुपये

सर्वात जास्त चौकार (फोर) : साई सुदर्शन- 10 लाख रुपये

कॅच ऑफ द सीजन: मनीष पांडे- 10 लाख रुपये

प्लेअर ऑफ द फाइनल : विराट कोहली- 5 लाख रुपये

पिच अँड ग्राऊंड अवॉर्ड : ईडन गार्डन्स – 50 लाख रुपये

पिच अँड ग्राऊंड अवॉर्ड : धर्मशाला- 25 लाख रुपये

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!