🕒 1 min read
IPL Final | एका बाजूला सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न अगदी काही धावांनी भंगलं अन् काही तासांतच थेट मृत्यूशी गाठ पडली, असं कोणासोबत घडू शकतं? काल मध्यरात्री गुजरात टायटन्सच्या अख्ख्या संघावर असाच एक धडकी भरवणारा प्रसंग ओढवला आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आरसीबीकडून फायनलमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर गुजरातचा संघ हॉटेलकडे परतत होता. याच दरम्यान त्यांच्या धावत्या बसला अचानक भीषण आग लागल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Gujarat Titans Bus Fire Live Video Viral After IPL Final
या थरारक घटनेचा ३७ सेकंदांचा एक खळबळजनक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. बसमधून धुराचे लोट निघू लागताच खेळाडूंची एकच पळापळ झाली. जीवाच्या आकांताने कोण रस्त्याच्या कडेला धावत सुटलं, तर काही खेळाडू थेट झाडीझुडपांच्या आडोश्याला जाऊन उभे राहिले.
मिळालेल्या माहितीनुसार… रविवारी रात्री मॅच संपवून परतताना बसमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि आग भडकली. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी जागीच थांबवली. त्यामुळेच सुदैवाने सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ वेळेत बाहेर पडू शकले आणि एक फार मोठी अनपेक्षित दुर्घटना टळली.
या घटनेनंतर गुजरातच्या खेळाडूंना तब्बल एक तास महामार्गावरच ताटकळत उभे राहावे लागले होते. त्यानंतर व्यवस्थापनाने दुसरी वाहने मागवून त्यांना सुरक्षित हॉटेलमध्ये पोहोचवले. आधीच धर्मशाला, मुल्लांपूर आणि अहमदाबाद असा सततचा थकवणारा प्रवास आणि त्यात खराब हवामानाचा ताण असताना या आगीच्या घटनेने खेळाडूंना पुरतं हादरवून सोडलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार… प्राथमिक तपासात आगीचे कारण तांत्रिक बिघाड म्हणजेच शॉर्ट सर्किट असल्याचं समोर आलं असून पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट अन् सरकारवर हल्लाबोल; लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिलांना का काढलं?
- महायुतीची अंतिम यादी जाहीर; १७ जागांचा सस्पेन्स संपला, पण ‘या’ नावावरून खळबळ!
- हवामान खात्याचा मोठा इशारा; मान्सून खोळंबला अन् शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











