🕒 1 min read
Monsoon Updates | तुम्हीही आकाशाकडे डोळे लावून मान्सूनची वाट पाहत आहात आणि पहिल्याच पावसात पेरणी करायची तयारी केली आहे? मग थांबा, कारण हवामान खात्याने नुकतीच दिलेली एक बातमी ऐकून कदाचित तुमच्या नियोजनात मोठा बदल करावा लागेल.
राज्यात मे महिन्यातील कडक उन्हाच्या झळा संपून आज १ जूनपासून हवामानाचा नूर पार बदलून गेला आहे. पण सध्या ठिकठिकाणी पडणारा पाऊस हा मान्सूनचा नसून केवळ अवकाळी आहे, त्यामुळेच १० जूनपर्यंत तरी राज्यात अधिकृत मान्सून येण्याची चिन्हे नाहीत.
Monsoon Updates Delayed Arrival In Maharashtra
हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. कोकण किनारपट्टीच्या भागातही पावसाच्या काही हलक्या सरी कोसळतील. मात्र हा पाऊस केरळमधून आलेला नाही, कारण मान्सून अजून तिकडेच रेंगाळला आहे.
दुसरीकडे… राज्यातील कमाल तापमानात काहीशी घट झाल्याने उकाड्यापासून लोकांना थोडा दिलासा मिळालाय खरा. पण पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला असल्याने तिथली उष्णता कायम आहे.
याच दरम्यान आपत्ती व्यवस्थापन आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी अत्यंत काळजीची माहिती देत एक जाहीर आवाहन केले आहे. केवळ या मान्सूनपूर्व पावसावर विसंबून राहून शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करण्याची घाई अजिबात करू नये. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय घाईघाईत पेरणी केल्यास महागडे बियाणे वाया जाण्याची मोठी भीती असते.
विजांचा कडकडाट सुरू असताना विनाकारण घराबाहेर पडू नका, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वीज चमकत असताना मोठ्या झाडांखाली, टिनशेडखाली, वीज खांब किंवा उघड्या विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे पूर्णपणे टाळावे, अन्यथा मोठा अनर्थ घडू शकतो.
📌 महत्वाच्या बातम्या
- किरीट सोमय्या यांना भोंदू खरातची भूमिका मिळणार का? भोंदू खरातच्या सिनेमावरून सुषमा अंधारेंनी डिवचले
- शुबमन गिलने फायनलमधील पराभवानंतर मौन सोडलं, आरसीबीच्या विजयावर म्हणाला की…
- विराट कोहलीने अखेर उघड केलं आरसीबीच्या जेतेपदाचं गुपित, मुंबई इंडियन्सचा उल्लेख करत म्हणाला की…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










