Share

किरीट सोमय्या यांना भोंदू खरातची भूमिका मिळणार का? भोंदू खरातच्या सिनेमावरून सुषमा अंधारेंनी डिवचले

भोंदू बाबा अशोक खरातवरील आगामी सिनेमाच्या कास्टिंगवरून ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्यांना लक्ष्य केलं असून, दीपाली सय्यद यांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे.

Published On: 

Bhondoo Kharat Movie Sushma Andhare reacting to Kirit Somaiya and Deepali Sayed

महिलांचं लैंगिक शोषण करणारा आणि भोंदूगिरीच्या नावाखाली करोडोंचा गंडा घालणारा बाबा अशोक खरातच्या आयुष्यावर चक्क सिनेमा येतोय, ही बातमी ऐकून तुम्हालाही धक्का बसला ना?

सध्या राज्याच्या राजकारणात याच भोंदू खरातच्या (Ashok Kharat Movie) कारनाम्यांची जोरदार चर्चा आहे. आता याच बहुचर्चित सिनेमाच्या निमित्ताने ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यात जोरदार जुंपली असून, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Bhondoo Kharat Movie

माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर थेट हल्लाबोल केला. “मुलुंडचे एचडी व्हिडीओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांना अशोक खरातची भूमिका मिळते का? हे बघणं जरा औत्सुक्याचं ठरेल,” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.

खरातने भोंदूगिरीच्या माध्यमातून सामान्य लोकांपासून ते अगदी सेलिब्रिटी आणि राजकारण्यांनाही कसं गंडवलं, हे संपूर्ण देशाने पाहिलं आहे. आता याच विषयावर येत असलेल्या सिनेमात दीपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार असल्याची सध्या चर्चा आहे.

यावर बोलताना अंधारे म्हणाल्या की, दीपाली सय्यद या मुळात एक कलाकार आहेत. त्यामुळे त्यांनी कुठे काम करावं याचं पूर्ण स्वातंत्र्य त्यांना असलं पाहिजे. पण केवळ सिनेमात काम करतात म्हणून त्यांना धमक्या देणं चुकीचं असून आपण त्याचा तीव्र निषेध करतो.

दुसरीकडे, अंधारेंच्या या बोचऱ्या टीकेनंतर दीपाली सय्यद यांनीही पलटवार करत थेट मोठा गौप्यस्फोट केला आहे. “सुषमा अंधारेंची मला कीव येते. एक महिला म्हणून त्यांनी असं बोलणं अजिबात शोभत नाही,” असा संताप सय्यद यांनी व्यक्त केला.

इतकंच नाही तर, खरात प्रकरणात कुठेतरी अंधारेंचाही संबंध असल्याने सिनेमात त्यांचीही भूमिका असणार आहे, असा धक्कादायक दावा दीपाली सय्यद यांनी केल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमात अशोक खरातच्या भूमिकेसाठी थेट बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीला विचारणा केली जाऊ शकते. हा सिनेमा येत्या ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याने आता पडद्यावर नेमकं काय पाहायला मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install