Share

“लॉकडाऊनमध्ये त्याची नोकरी गेली…”, अनिकेत सराफ नेमकं परदेशात काय करतो? आई निवेदिता म्हणाल्या…

निवेदिता आणि अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेत अभिनयापासून दूर असून, सध्या तो लंडनच्या प्रतिष्ठित ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत आहे.

Published On: 

Aniket Saraf profession details revealed by Nivedita Saraf in podcast

मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे सुपरस्टार अशोक मामा (Ashok Saraf) आणि निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांचा मुलगा कधीच कॅमेऱ्यासमोर का आला नाही? आई-वडील इतके मोठे स्टार्स असूनही या पोराने वेगळाच रस्ता का निवडला, हा प्रश्न तुम्हालाही कधीतरी नक्कीच पडला असेल.

आता स्वतः निवेदिता सराफ यांनीच या विषयावर मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘सर्वकाही’ या पॉडकास्टमध्ये नुकतीच मुलाखत देताना त्यांनी आपला एकुलता एक मुलगा अनिकेत सराफ (Aniket Saraf) याच्या करिअर आणि परदेशातील संघर्षाबद्दल धक्कादायक माहिती दिली आहे.

Aniket Saraf profession

अभिनयाच्या झगमगाटापासून कोसो दूर असलेला अनिकेत सध्या लंडनच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा ‘ऑक्सफर्ड’ विद्यापीठात इंग्रजी शिकवतोय. केवळ शिकवण्याचं कामच नाही, तर आता तो तिथे मोठी प्रशासकीय जबाबदारीही उत्तमरित्या सांभाळत आहे.

निवेदिता ताईंनी सांगितल्यानुसार, अनिकेत खरंतर एक उत्तम शेफ होता आणि त्याचं लिखाणही कमाल आहे. पण काही वर्षांपूर्वी तो कॅनडामध्ये असताना अचानक लॉकडाऊन लागलं आणि यातच त्याची नोकरी गेली. या कठीण काळात आई-वडिलांनी त्याला भारतात परत बोलावले, पण त्याने हार न मानता तिथेच राहून लढण्याचा निर्णय घेतला.

परदेशात स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्याने ‘अॅक्सेंट कोच’ (Accent Coach) म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही विशेष परीक्षा दिल्या आणि थेट ऑक्सफर्ड इंग्लिश सर्कलमध्ये धडक मारली.

जेव्हा परिस्थिती पूर्वपदावर आली, तेव्हा शेफ प्रोफेशनपेक्षा टीचिंगमध्ये अधिक यश आणि चांगला पैसा मिळत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. सुरुवातीला टोरंटोमध्ये शिकवणारा अनिकेत आज ऑक्सफर्डमध्ये आपला दबदबा निर्माण करून आहे. सुपरस्टारचा मुलगा असूनही कोणाच्याही ओळखीचा वापर न करता स्वतःच्या हिमतीवर त्याने मिळवलेलं हे यश खरोखरच प्रेरणादायी आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install